आणि–सर्वानीच केला,  जिजाऊला मानाचा मुजरा …

0
165

प्रबोधन…

महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती यंदा आग्रासह , संपूर्ण देशात गल्ली पासून दिल्ली पंर्यत मोठ्या ऊत्साहात आणि आत्मियतेने साजरी करण्यात आली . त्याला नासिक शहर ही अपवाद नव्हते.

   .. एक फूटा पासून तर एकसस्ष्ठ फूटापंर्यतच्या मनवेधक शिवरायांच्या पुतळ्यांच्या साक्षीने,तमाम नासिकरांच्या सहभागातून संपूर्णनासिक शहरात, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नानाविध प्रकारे चौका चौकात साजरी करण्यात आली. मराठा विद्या प्रसारक संस्थेचे क्रुषी महाविद्यालयही त्यात अग्रेसर होते.  

 फंद फितुरी आणि दगाबाजी करुन शिवाजी महारांजाना संपविण्याचा अफझलखानाचा प्रयत्न , शिवाजी महाराजांनी कसा हानून पाडला व विश्वासघात करणार्या अफझल खानाचा कोथळा कसा बाहेर काढला ,हा जिवंत देखावा ,मराठा विद्या प्रसारक संथेच्या क्रुषी महाविद्यालयाच्या वतिने, संस्थेच्या आवारात, शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात सादर कलण्यात आला. 

 दगा बाज अफझल खानाला जन्माची अद्दल घडविण्याच्या मोहिमेवर जाण्या अगोदर, छत्रपती शिवाजी महारांज मातोश्री जिजाऊंचा पद स्पर्श करून आशिर्वाद घेण्यासाठी नतमस्तक झाले तेव्हा ” त्या ” जिजाऊला ऊपस्थित सर्वानीच मानाचा मुजरा केला , आणि — , आसमंत दणानून सोडणारा टाळ्यांचा कडकडाट झाला. या देखाव्यात ज्या जिजाऊला मानाचा मुजरा करण्यात आला ,”ती जिजाऊ “साकारली होती धुळ्याचे जेष्ठ पत्रकार , बुजुर्ग सामाजिक कार्यकर्तै बाबासाहेब महेश घुगे यांची नात, कु. वैष्णवी सुनिल कापसे हिने. कपट कारस्थान करुन दगाबाजी करणार्याला कडक शासन करण्याचा संदेश देणारा ” तो देखावा, ” नाशकातील शिवजयंती ऊत्सवातील “प्रमुख आकर्षण ” ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here