गडचिरोली : राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती आयोग, भारत सरकार यांच्याशी संलग्न असलेल्या राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती विकास परिषद, नवी दिल्ली यांच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी नरेंद्र विश्वनाथ उंदिरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबाबत नवी दिल्ली येथील परिषदेचे राष्ट्रीय प्रभारी पी. सी. बेखाल (सेवानिवृत्त आय.ए.एस.), राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण मांगरिया, संरक्षक जुएल उराव (केंद्रीय मंत्री, जनजाती मंत्रालय, भारत सरकार), संरक्षक मा. मुकुल वासनिक (माजी केंद्रीय मंत्री, भारत सरकार), राष्ट्रीय महासचिव मा. डॉ. देवराव होळी, राष्ट्रीय संयोजक फग्गनसिंग कुलस्ते (माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जाती-जनजाती आयोग), तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. इंजि. रखीजी सोमकुवर यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल श्री. उंदिरवाडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.