अहेरी नगरपंचायत मधील सत्ताधारी गटाचे संपुर्ण ९ नगरसेवक अपात्र..!!
अहेरी नगर पंचायत मागील तिन वर्षांपासून सतत वादाच्या भोवर्यात आहे. नियमबाह्य निवीदा प्रक्रीया असो की सत्ताधार्यांचे विविध प्रकरणातील वादातुन कंत्राटदारांवर ॲट्रॉसिटी चे प्रकरण असो अथवा सतत विवादात राहीले आहे ते चक्क तत्कालीन मुख्याधिकारी दिनकर खोत विरोधात सुध्दा ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत खुद्द नगराध्यक्षांनी तक्रार नोंदविली होती.
अहेरी नगरपंचायत मध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार गटाची सत्ता होती. शिवसेना (ऊबाठा) व राष्ट्रवादीच्या फुटीर गटाच्या मदतीने सत्ता स्थापित केली होती.सुमारे अडीच वर्षांपुर्वी अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील शासकीय जागेवरच्या अतिक्रमणाला पाठबळ देणारा ठराव सत्ताधारी नगरसेवकांनी बहुमताच्या जोरावर नगरपंचायतचा सर्वसाधारण सभेत पारित केला होता. त्या वेळी शासकीय जागेवर अतिक्रमनाला संरक्षण देणारे कृत्य नगरसेवकांकडून करण्यात आले होते.
नगरसेवकपदाच्या दुरुपयोग विरोधात भाजपा गटातर्फे जिल्हाधिकारी, गडचिरोली न्यायालयात नगरपालिका, नगरपंचायत अधिनियम १९६५ कलम ४४ (३) नुसार फिर्याद नोंदविली गेली.जिल्हाधिकारी गडचिरोली यांना बेकायदेशीर अतिक्रनाचे सर्व पुरावे देऊन भाजपा नगरसेवकांनी मागील अडीच वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला, मागिल दोन वर्षांपासुन सदर प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागुन होते. बघता बघता अडीच वर्षे लोटली त्यामुळे निकाल लागेपावतो सत्ताधार्यांचा कार्यकाळ संपेल काय? अशी शंका देखील व्यक्त केली जात होती. काल जिल्हाधिकारी मा. संजय दैने ह्यांनी ह्या प्रकरणाचा निकाल देत सत्ताधारी गटाच्या नगराध्यक्षा रोजा करपेत आणि उपाध्यक्ष शैलेष पटवर्धन यांच्यासह विलास सिडाम, नौरास रियाज शेख, मिनाताई ओंडरे, सुरेखा गोडशेलवार,ज्योती सडमेक, विलास गलबले, महेश बाकेवार या सर्वच ९ नगरसेवकांना काल आदेश काढून अपात्र घोषीत केले.
दोन महीण्यांपुर्वीच यातील सात नगरसेवकांनी पक्षांतर केलेले होते हे विशेष. निकाल आपल्या विरोधात लागू शकतो याची भिती असल्याने कॅबिनेट मंत्र्यांकडून अभय मिळेल यासाठीच पक्षांतर झाले अशी जोरदार चर्चा त्यावेळे झाली होती.शेवटी पक्षांतराचा डाव सुध्दा निष्फळ ठरल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
कालच जिल्हाधिकार्यांची बदली झाली हे विशेष.जाता जाता शेवटच्या क्षणी निकाल देऊन त्यांनी जोरका धक्का दिला अशी सर्वत्र चर्चा आहे..!!