गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्याला विकासाचे द्वार बनविणार अशी भूलथापा देणाऱ्या राज्यसरकार ने तथा सरकारी अधिकाऱ्यांनी, साखरा गावातील काही ग्रामवासियांनी रेल्वेचे काम थांबविण्याच्या घटने कडे चार महिन्यांपासून मुद्दाम दुर्लक्ष केल्याची लाजिरवाणी बाब उघडकीस आली आहे.
या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता साखरा येथील गावकऱ्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांशी वाटाघाटी करून ठरलेल्या दरा प्रमाणे आपल्या जमिनीचे विक्री पत्र रेल्वे प्रशासनाला करून दिले होते.
त्या जागेचे विक्री पत्र झाल्यावर संबंधित जागेचे फेरफार होऊन ती जागा आज रेल्वे प्रशासनाच्या नावाने नोंद करण्यात आलेली आहे,तरी सुध्दा अशा प्रकारे गावकरी रेल्वेचे काम थांबविण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला प्रशासन दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील लाखो लोकांमध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे.
एकीकडे राज्याचा पहिला जिल्हा आहे म्हणून बोलायचे आणि दुसरीकडे रेल्वेच्याच कामाकडे दुर्लक्ष करणे, अशी प्रशासनाची ही भूमिका आता संशयित वाटू लागली आहे.
या बद्दल रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की साखरा गावातील लोकांनी रेल्वेचे काम थांबविल्याची माहिती, गडचिरोली चे जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी तथा भू संपादन अधिकारी यांना तीन वेळा लिखित पत्र देण्यात आले आहे,पण कोणत्याही शासकीय यंत्रणेने होणाऱ्या कामाला सुरक्षा पुरविली नाही अशी धक्कादायक बाब आमच्या प्रतिनिधी कडे सांगितली .
सदर चे काम थांबविल्या ची माहिती माजी खासदार अशोक नेते यांना सांगितली असता, त्यांनी सुध्दा प्रशासनाच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करून रेल्वे कामांची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांना ताबडतोब याची दखल घेण्याची सूचना केली.