विजया महिला नागरी पतसंस्थेत 67 लाखाची फसवणूक….एजेंट वर गुन्हा दाखल,संस्थाचालक मोकाट.

0
1510

गडचिरोली.21/2/2023

गडचिरोली शहरात मागील वीस वर्षापासून चालत असलेली विजया नागरी पतसंस्थेत 67 लाखाची रक्कम गुंतवणूक करून दाम दुप्पट पैसे देण्याचा आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती नवेगाव परिसरातील नागरिकांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली.

या सर्व आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांपैकी बबिता समारू गुलात्रस यांनी सुध्दा,विजयाताई शरदराव गद्देवार अध्यक्ष विजया महिला नागरी पतसंस्था यांनी, आपली पाच लाखाची फसवणूक केल्याची तक्रार 9 /2/2023 रोजी पोलिस ठाण्यात केलेली असताना सुध्दा आजतागायत गडचिरोली पोलिस ठाण्यात विजया महिला नागरी पतसंस्थे विरूध्द कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,  लाखोंच्या घरात फसवणूक केल्याची घटना उघडकीस आणून दिली असताना सुध्दा गडचिरोली पोलिसांनी तक्रारीवर गंभीरतेने विचार केला नाही.यावरून कोणत्यातरी राजकीय पक्षांच्या नेत्याच्या दबाब आल्याने पोलिसांनी संशयित भूमिका घेतली की काय अशी शंका पीडितांना होत आहे.

चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे या पत संस्थेत मामिडवार नावाच्या व्यवस्थापकाने,करोडोची आर्थिक घबाड केली असून सहायक संस्था निबंधकाने कोणतीही कारवाई केली नाही, यावरून सहायक संस्था निबंधकाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात येत असल्याची माहिती काही लोकांनी बोलून दाखवली.

विजया महिला नागरी पतसंस्थेच्या लोकांनी, 67 लाखाची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पिडीतांनी पोलिसांना केली होती, परंतु कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने पीडितांनी पोलिस अधीक्षक यांची भेट घेऊन सदर पतसंस्थेविरूध्द कारवाई करावी अशी विनंती काल केली होती.

सदर तक्रारीची दखल घेऊन ताबडतोब गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी दिल्यामुळे काल रात्रोला विजया महिला नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापक मंगेश नरड यांच्या विरोधात कलम 406,409,420,467,468,471 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, संस्थेच्या संचालक विरूध्द कोणतीही कारवाई करण्यात आली नाही हे विशेष…

सदर गुन्ह्याचा तपास ठाणेदार अरविंद कतलाम स्वतः करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेहमी प्रमाणे पुढील तपास होणारच आहे, परंतु पीडितांना न्याय मिळवून बुडलेला पैसा लवकर परत मिळेल, अशी पीडितांची अपेक्षा आज पत्रकार परिषदेत दिसून आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here