प्रबोधन….
महेशबाबा घुगे यांच्या लेखणीतून…
अतिशय प्रतिकुल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी,बलाढ्य अशा मोगल साम्राज्याशी , तुटपुंज्या सैन्या द्वारे आणि मर्यादीत शस्त्र सांभाराच्या आधारे चीवट झुंज देऊन स्वराज्याची स्थापना केली।
मर्यादित सैन्य, आणि तुपपुंजा शस्रसाठा याच्या जोरावर शत्रु पक्षावर मात करण अवघड असल्याची कल्पना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या सहकार्यांना होती. पण स्वराज्य स्थापनेची मनस्वी तळमळ, त्यासाठी आरपार झूंज देण्याची व वेळ पडली तर धारातिर्थी पडण्याची तयारी , शिवाजी महाराजांसह त्याच्या निष्ठावंत सैनिकांची होती.
समाजातील अठरा पगड जाती जमातीचे मावळे शिवाजी महाराजा सोबत होते. कुठलाही धोका असला तर तो धोका पत्करण्यासाठी सैन्यात स्पर्धा असायची.
मोगल सम्राट जातीने मुसलमान होते पण , मुसलमान म्हणून शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी युद्ध छेडले नव्हते तर त्यांच्यातील दुष्ठ प्रवृती, विरुद्ध शिवाजी महाराजांचा लढा होता. तसे नसते तर, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान सैनिकांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली नसती. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मीर महमंद नसता तर ,जगाला शिवाजी महाराजांची खरी ओळख झालीच नसती.
शिवाजी महाराजांचया तोफखान्याचा प्रमुख, ईब्राहीम खान होता. दौलत खान हा शिवाजी महाराजांचा जीव की प्राण होता, शिवाजी महाराजांचा अंग रक्षक ईब्राहीम सिद्धी होता, शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याची धुरा रुस्तम ए जमान याच्या हातात होती.
सर्व धर्म समभावाच धोरण छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंगिकारला होता , त्यामुळे सर्व जाती धर्माचे,पंथाचे लोक शिवाजी महारांजाच्या सैन्यात कार्यरत होते.
याही पेक्षा गनिमी कावा, शिवाजी महाराजांना अवगत होता . त्यामुळेच मर्यादित सैन्य आणि मर्यादित शस्त्रसांभांराच्या आधारे शिवाजी महाराजांनी बलाढ्य मोगल संम्राटांना दे माय धरणी ठाय करुन सोडले होते.