Gadchiroli district highlights..10/11/2022
गडचिरोली शहरातील अनेक दुचाकी धारकांनी रेसिंग बाईक वरून धुडगूस घालत शहरात नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवीत असल्याची तक्रार पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्याकडे काही जागरूक नागरिकांनी केली होती.त्या तक्रारीवरून वाहतूक विभागाची चार पाच पथके निर्माण करून शहरातील,इंदिरा गांधी चौक,कारगिल चौक,शिवाजी महाविद्यालय, परिसरात दुचाकी वाहनांची तपासणी करून मागील दोन दिवसांपासून कायदेशीर कारवाई करून 20 दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेल्या दुचाकी, कर्कश हॉर्न लावणे,नंबर च्या ठिकाणी नावं लिहिणे, वाहतुकीचे नियम तोडून तिब्बल सीट बसणे अशा अनेक कारणांमुळे वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली होती.
शहरात महामार्गाचे काम कासवगतीने होत असल्याने,तसेच गडचिरोली शहरातील प्रमुख ठिकाणी दुचाकी धारकांनी शहरात विनाकारण मौज मजेसाठी धिंगाने करीत,वाहतुकीचे नियम तोडून आपापसात रेसिंग लाऊन रोड वरून चालणाऱ्या लोकांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना नुकसान सोसावे लागले होते हे विशेष….
सदर ची धाडसी कारवाई अतिरिक्त पोलिस निरीक्षक पुनम गोरे,यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली होती.