Gadchiroli district highlights..10/11/2022
गडचिरोली – चामोर्शी तालुक्यातील १५ कि. मी . अंतरावरील भाडभिडी गावातील गुराखी दशरथ उंदरू कुनघाडकर वय ६० वर्ष हा जंगलात गुरे राखण्या करीता जंगलात गेला असता, जंगलात दडून बसालेल्या वाघाने दशरथ याला ठारच केले नाही तर त्याचे मृतदेहाचे तुकडे तुकडे केले होते .
सायंकाळीं गुराखी घरी आला नाही तेव्हा गावकर्यानी शोधा शोध केली असता दशरथ याचे मृतदेहाचे तुकडे तुकडे दिसले वाघ मात्र पसार झाला होता .चामोर्शी वनविभाग च्या कर्मचाऱ्यांनी मौका चौकशी करून काल दि. ९ नोव्हेबर सकाळी ९. वाजता मृत्युदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे नेण्यात आले होते .
दशरथ च्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आली होती . अशा प्रकारे वाघाने मानवी शरीराचे लचके तोडून शिकार केल्याची घटना प्रथमच गडचिरोली जिल्ह्यात घडलेली आहे.
सदर नरभक्षक वाघ चामोर्शी तालुक्यातील जंगालात सुध्दा पोहचला त्यामुळे सदर पारिसरात वाघाची दहशत पसरली आहे . जंगलात जावू नये अशी मुनादी वनविभागाने दिली आहे.