Gadchiroli district highlights..9/11/2022
गडचिरोली शहरात मध्यभागी असलेल्या अभिनव लॉन च्या परिसरात चालू असलेल्या मिनाबाजारात डान्सिंग झुला तुटल्याने एक युवती किरकोळ जख्मी झाल्याची घटना आज रात्री नऊ वाजता च्या सुमारास घडली.झुला तुटल्याने काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून, मागच्या आठवड्यात जम्पिग एअर बलून फुटल्याने काही लहान मुले फुग्यावरून खाली पडली होती,परंतु त्यावेळेस काही अनर्थ घडला नव्हता, यावरून आज पुन्हा अशी दुर्घटना घडल्याचे बघून, मीना बाजार चालविणाऱ्या पद्धतीवर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती,तो पर्यंत युवतीला चामोर्षी रोडवरील कुंभारे यांच्या खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
मीना बाजारातील सर्व वाहने,यंत्र सामग्री यांचे मशीन फिटनेस प्रमाण पत्र योग्य आहे की नाही याची खात्री करून पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे.
झुल्यावरुन पडल्याने युवतीला नाकावरती किरकोळ मार लागलेला असून,चालत्या झुल्यावरून पडल्याने सुध्दा युवती अगदी सुरक्षित वाचली होती.झालेल्या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेतली असता,मीना बाजारातील व्यवस्थापक,आणि दुकानदारांना बोलाऊन सर्व यंत्राची देखभाल करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याची ताकीद पोलिस प्रशासनाने दिली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांनी दिली आहे.