नापिकीच्या भीतीने मृत्यूला कवटाळलेल्या सदाराम मडावी यांच्या कुटुंबाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा आधार… शेतकऱ्याच्या कुटुंबाला अरविंद कात्रटवार यांच्या वतीने आर्थिक मदत.

0
29

 

बळजबरीने कर्जवसुली करणाऱ्यांना शिवसैनिक सोडणार नाहीत – अरविंदभाऊ कात्रटवार यांचा इशारा…

 

आरमोरी:आरमोरी तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी सदाराम धर्मा मडावी (वय ६७) यांनी सततच्या नापिकीला कंटाळून आणि कर्जाच्या ओझ्याने त्रस्त होऊन दि. १५ सप्टेंबर रोजी स्वतःच्या शेततळ्यात उडी घेऊन आत्महत्या केली. घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

या घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांनी शिवसैनिकांसह मडावी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. सेवाभाव जपत कात्रटवार यांनी कुटुंबाला आर्थिक मदत दिली आणि शासनाकडून मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.

मडावी यांच्याकडे ४ एकर शेती होती. त्यांनी खासगी व सहकारी संस्थांकडून कर्ज घेऊन धानाची रोवणी केली होती. परंतु सततच्या नापिकीमुळे उत्पन्न न मिळाल्याने कर्जफेड आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह याची तीव्र चिंता त्यांना सतावत होती. अखेर त्यांनी हतबल होऊन आत्महत्या केली.

यावेळी बोलताना अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले –

“शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. मात्र कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी उध्वस्त होत आहे. बँकांकडून व खासगी सावकारांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जातो. अशा वेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापर्यंत मजल मारावी लागते, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. बँकांनी व सावकारांनी बळजबरीने कर्जवसुली करू नये. जर कुणी शेतकऱ्यांवर अन्यायाने तगादा लावला, तर शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. जबरदस्ती करणाऱ्यांना कोपऱ्यापासून ढोबऱ्यापर्यंत सोलून काढले जाईल.”

 

या वेळी यादवजी लोहंबरे, प्रशांत ठाकूर, दिलीप वलादी, गुलाब शेरकी, सचिन कोडाप, कुमदेव आवारी, प्रमोद आवारी, गुरुदास कोडाप, दीपक कोसमशीले, सेनापती शेरकी, महेश खेडेकर, प्रवीण आवारी, साहिल कोसमशीले, महेक कोडाप, मोहित कोसरे, लंकेश सयाम, प्रमोद ठाकरे, विनोद खेवले, मोहित लाजूरकर, लीलाधर मुनघाटे, पराग कुमरे, प्रज्वल वट्टी, पुंजीराम लाजूरकर, चेतन चिकराम, साहिल ठाकरे, भक्तदास झरकर, चंद्रभान कुमरे, प्रफुल डोईजड, लोमेश कुमरे, मंगेश पिठाले, शुभम समर्थ, आदिनाथ वाघमारे, पितांबर नैताम, सूरज कलसार, विलास ठाकरे, मुखरू गेडाम, मोरेश्वर वाकडे, राहुल खेवले, प्रफुल पिठाले, सुभाष म्हस्के, मोहन कुकडकार, विनोद चापले, निरंजन लोहंबरे, पद्माकर होळी, तानबाजी दाजगाये, विलास नैताम, वीरेंद्र मोगरकर, भूमेश्वर मोगरकर, राहुल सावरकर, विलास ढोमणे, अमोल भैसारे, सुधाकर धाकडे, हिरा हर्षे, पुरुषोत्तम ढोलणे, आनंदराव सोरते, मनोहर भैसारे, सुनील मादेशवार, ज्ञानेश्वर उमलवार, हितेश वाघाडे, कालिदास चिठ्ठलवार, जितेंद्र गांधरवार, रोहित कस्तुरे, आदित्य परसे, पुरुषोत्तम कुमरे, विनोद नरुले, प्रफुल गुरुनुले, अमोल मेश्राम, गणेश गेडाम, सुजल मडावी, सुभाष गुरुनुले, अमित हुलके, सचिन सेलोटे, नंदू शेडमाके, कवळूजी धंदरे, विठ्ठल मंदिरकर, मधुकर बावणे, तेजस धंदरे, गिरीश टेकाम, देवेंद्र वलादे, अजय सेलोटे आदी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here