Gadchiroli district highlights..6/11/2022
गडचिरोली शहरात दुचाकी व चारचाकी वाहन विक्रेत्यांचे शोरूम मोठ्या प्रमाणात आहे. शहरातील जवळपासच्या ग्रामीण भागातील जनता दुचाकी वाहने खरेदी करण्यासाठी शोरूम मध्ये जातात त्या शोरूम मध्ये खाजगी फायनान्स कंपनीचे एजेंट बसून असतात, ते एजेंट सदर ग्राहकास भूलथापा देऊन एका दिवसात कर्ज मंजुरीचे कारवाई करून देण्याचे कामे करतात व त्यांच्याकडून डाऊन पेमेंट घेऊन वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या घेऊन त्यांना त्याच दिवशी गाडी मिळवून देतात त्यानंतर बरेच जास्त शुल्क लावून प्रोसेसिंग फी च्या नावाने रक्कम कपात करतात. सदर प्रोसेसिंग फी लावल्याचे त्या ग्राहकांना माहिती सुद्धा देण्यात येत नाही हे विशेष….
काही शेतकरी अथवा मजूर वर्ग जे खाजगी फायनान्स कडून कर्ज घेऊन दुचाकी वाहनाचे खरेदी करतात त्यांचे दोन तीन महिन्याचे हप्ते थकीत झालेले असताना फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन सदर ग्राहकांची वाहने जबरदस्तीने उचलून घेऊन जातात, परंतु सदर फायनान्स कंपनी जरी कर्जाची हप्ते थकीत असले तरी कर्जदारास दमदाटी देऊन किंवा त्याचे वाहन परस्पर ताब्यात घेऊ शकत नाही, फायनान्स कंपनीचे व्यवस्थापकांनी न्यायालयीन मार्गाने वाहन ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालय मार्फत घ्यावा असे माननीय न्यायालयाने निकाल क्रं 1,CITICORP MARUTI FAINANCE विरूध्द VUJAYLAXMI स.C. 2011आणि निकाल क्रं 2,MANAGER ICICI BANK LTD. विरूध्द PRAKASH COUR S.C.2007 या आपल्या दोन्ही निकालात आदेशित केले आहे.
खाजगी शोरुम मालकांना तसेच फायनान्स कंपनी ला आरटीओ विभागाचे सहकार्य होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही ..तरी ज्या ग्राहकांचे खाजगी अथवा बँकेचे वाहन खरेदी कर्जाचे हप्ते थकीत असतील त्यांनी आपले वाहने अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना नेव देऊ नये तसेच त्यांची तक्रार पोलीस ठाण्यात करण्याची गरज आता कर्जावर वाहन घेणाऱ्या लोकांना झालेली आहे.