Gadchiroli district highlights..8/11/2022
तासाभरापासून मच्छरांनी पेशन्ट झाले हैराण
गडचिरोली : काॅम्पलेक्स येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील पेशन्ट गेल्या तासाभरापासून मच्छरांच्या त्रासामुळे हैराण झाले असून संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरलेला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या विविध दुरुस्ती कामे करणे सुरू असल्याने आज अचानक ५ वाजता दरम्यान संपूर्ण रुग्णालयातील वीज पुरवठा खंडित झाला. मात्र सर्व सोई सुविधांनी सज्ज असलेल्या रुग्णालय प्रशासनाने जनरेटर सुरू न केल्याने रुग्णालयात तासाभरापासून सर्वत्र अंधार पसरलेला असून मच्छरांच्या त्रासामुळे रुग्ण हैराण झाले आहेत. याबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला आहे.