Home ब्रेकिंग न्यूज चामोर्शीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पेंटिंग काम करणारा आरोपी अटकेत…

चामोर्शीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पेंटिंग काम करणारा आरोपी अटकेत…

0
537

 

 

*गडचिरोली, ०८ जून २०२६*

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ वर्षांखालील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घराच्या स्लॅबवर पेंटिंगचे काम करत असलेल्या इसमानेच हा घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.

 

चामोर्शी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ०८ जून २०२६ रोजी सकाळी ९.१५ ते ९.३० या दरम्यान चामोर्शी तालुक्यातील मौजा येथील फिर्यादीच्या राहत्या घराच्या स्लॅबवर ही घटना घडली. घराच्या स्लॅबचे पेंटिंगचे काम सुरू असताना, कामासाठी आलेला आरोपी प्रज्वल सदाशिव भांडेकर, वय २५-२६ वर्ष, रा. कोर्टाजवळ, चामोर्शी याने स्लॅबवर खेळत असलेल्या फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीला बाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक हमला करून बलात्कार केला.

 

पीडितेच्या जबाब आणि एमएलसी अहवालाच्या आधारे चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८०/२०२६ दाखल करण्यात आला. आरोपीवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१), ६५(२) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

ही तक्रार ०८ जून २०२६ रोजी दुपारी १.०६ वाजता दाखल झाली. पोलिसांनी झटपट कारवाई करत आरोपी प्रज्वल भांडेकरला अटक केली असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे.

 

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले हे करत आहेत. सध्या कायदे व सुव्यवस्थेचा प्रश्न नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून पुढील तपास सुरू आहे.

 

मुलांच्या सुरक्षेसाठी नागरिकांनी अधिक सतर्क राहावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here