वाघाच्या हल्यात लाखापूर येथील इसम ठार.. दोन दिवसातील दुसरी घटना.

0
413

Chandrpur district highlights..5/11/2022

ब्रम्हपुरी/प्रतिनिधी:-

 

तालुक्यातील लाखापूर गावालगत असलेल्या जंगलामध्ये वाघाने हल्ला करून एका इसमाच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना काल दिनांक 4/11/2022 ला रात्री च्या दरम्यान घडली आहे . दि. 3/11/2022 ला तोरगाव (बुज)येथील जाईबाई तोंडरे या महिलेवर केला होता हल्ला लगेच एक दिवसाआड पुन्हा वाघाच्या हल्ल्यात लाखापूर येथील इसम ठार.

 

सविस्तर वृत्तांत असे आहे की जगन पानसे रा.लाखापुर वय 75 वर्ष ता. ब्रम्हपुरी हे काल जंगलात काड्या तोडण्यासाठी गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले आहे. सदर व्यक्ती हा काल पासून बेपत्ता होता. आज सकाळी त्याचा मृतदेह गावालगतच्या सायघाटा बीट उत्तर वनपरिक्षेत्र ब्रह्मपुरी च्या जंगल परिसरातआढळून आला.

घटनेची माहिती मिळतात उत्तर वनपरिक्षेत्र ब्रह्मपुरी महेश गायकवाड क्षेत्र सहाय्यक मिलिंद सेमसकर वनरक्षक कागणे व पोलीस वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला होता.

मृतकाचे कुटुंबीयांना वन विभागातर्फे अंत्यसंस्कारासाठी तातडीची मदत करण्यात आली.संभाव्य वाघाचे धोके लक्षात घेता संबंधित वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी लाखापूर येथील ग्रामवासियांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here