वाघाचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी….
chandrpur district highlights…3/11/2022
ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव (मोठा) गावातील शेतशिवारात वाघाने हल्ला करून महिलेच्या नरडीचा घोट घेत ठार केल्याची घटना आज दिनांक: – 3/11/2022 रोजी सकाळी:-10 वाजताच्या सुमारास घडली आहे.
जाईबाई तुकाराम तोंडरे वय:- 55 वर्ष तोरगाव (मोठा) रहिवाशी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्तांत असे आहे की जाईबाई नामक महिलेच्या शेतावर धानपिकाची लागवड केली. धानपिकाचे पीक कापणीला आले असुन ते धानपिकाची कापन करण्यात आली. व कापनी केलेले धानपिक जमा करून धानपिकाचा पुंजना तयार करण्यात आला होता. धानपिकाचा पुंजना करीत असतांना काही ठिकाणी धानापिकाची लोंब पडलेली होती तो “सर्वा” (ग्रामीण भागातील शब्द ) वेचायला जाईबाई ही शेतावर गेली असता बांधाआड दबा धरून बसलेल्या वाघाने जाईबाई वर हल्ला करून ठार केलें.
जाईबाईच्या पश्चात कुटुंबात एकूण सात लोकांचा असा आप्त परिवार आहे.
संभाव्य वाघाचे धोके लक्षात घेता संबंधित वनविभागाने नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी तोरगाव (मोठा) ग्रामवासियांनी केली आहे..