Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीवर शोककळा : माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय पोरेड्डीवार...

गडचिरोलीवर शोककळा : माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय पोरेड्डीवार यांचे अकाली निधन…

0
1760

 

गडचिरोली, दि. १६ जून : गडचिरोली शहरातील प्रतिष्ठित सावकार पोरेड्डीवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गडचिरोली नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक सुरेश सावकार पोरेड्डीवार यांचे सुपुत्र अमेय पोरेड्डीवार (वय ३९) यांचे आज सकाळी अचानक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने संपूर्ण गडचिरोली शहरात हळहळ व्यक्त केली जात असून विविध क्षेत्रातील नागरिक, मित्रपरिवार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे साडेनऊ वाजताच्या सुमारास अमेय पोरेड्डीवार हे आपल्या राहत्या घरी नाश्ता करत असताना त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिचितांवर दुःखाचा आघात झाला आहे.

 

अमेय पोरेड्डीवार हे अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. सामाजिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक क्षेत्रात त्यांनी अनेकांशी स्नेहाचे संबंध जपले होते. त्यांच्या साध्या, नम्र आणि सहकार्यशील स्वभावामुळे शहरातील विविध स्तरांतील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आदराची भावना होती.

 

त्यांच्या निधनाच्या वृत्ताने गडचिरोली शहरात शोककळा पसरली असून अनेक नागरिकांनी सावकार पोरेड्डीवार कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांकडूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

अमेय पोरेड्डीवार यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे सावकार पोरेड्डीवार कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती ईश्वराने कुटुंबीयांना द्यावी, अशी भावना शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.

 

अंत्यसंस्कार उद्या….

स्वर्गीय अमेय पोरेड्डीवार यांच्यावर उद्या, दि. १७ जून २०२६ रोजी, गडचिरोली येथील कठाणी नदीच्या तीरावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

 

भावपूर्ण श्रद्धांजली!

 

“ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि सावकार पोरेड्डीवार कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here