बाप रे….वाघाने पुन्हा एका गुराख्याची शिकार केली.

0
755

Gadchiroli district highlights..3/11/2022

वाघाला जेरबंद करणार तरी कधी..
गडचिरोली मुख्यालय पासून अवघ्या बारा किमी अंतरावर असलेल्या राजगाटा चेक या गावात नरभक्षक वाघाने एका बैल चारायला गेलेल्या व्यक्तीला ठार केल्याची घटना आज दुपारी दोन वाजता घडली.वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव सुधाकर कारू भोयर वय 50 वर्ष हा व्यक्ती आपली जनावरे चारायला जंगल परिसरात गेला होता.
वन विभागाच्या वतीने वारंवार मनाई करण्यात आल्यानंतर सुध्दा मुद्दाम दुर्लक्ष करून जंगलात गेल्यामुळे दुर्दैवाने आज या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले आहे.

वाघाने शिकार केल्याची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.वाघाच्या हल्यात निष्पाप लोकांचा जीव धोक्यात येऊ लागल्याने आता ग्रामीण भागातील लोकांमध्ये दहशत निर्माण झालेली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वाघाला जेरबंद करण्यासाठी आवश्यक उपाय योजना करण्याची मागणी या परिसरातील लोकांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here