वाघाच्या हल्यात ठार झालेल्या नीकुरे यांच्या परिवाराची खासदार अशोक नेते यांनी घेतली दखल…

0
430

Gadchiroli district highlights..

वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या कळमटोला येथील इसमाच्या कुटुंबीयांची खा.अशोकजी नेते यांच्याकडून सांत्वनापर भेट.

दिं.२६ ऑक्टोंबर २०२२

पोर्ला: पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत कळमटोला येथे स्व.प्रभाकर तुकाराम निकुरे वय ५८ वर्ष हे दुपारी ३:०० वाजताच्या दरम्यान शेतशिवारात बैल चराईसाठी गेले असता दबा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले.वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या घटनेच्या संदर्भात माहिती दिली असता या संबधित खासदार साहेबांनी दखल घेत मागील अनेकदिवसापासून पोर्ला वनपरिक्षेत्रांतर्गत कळमटोला, जेप्रा,दिभना,या परिसरात वाघाची प्रचंड दहशत असून यामध्ये वाघाने अनेक इसमाच्या नरडीचा घोट घेतलेला आहे.

 

त्यामुळे गावाच्या परिसरातील जनता,नागरिक पूर्णपणे भयभीत झालेली असल्याने या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता खा.अशोकजी नेते यांनी वाघाचा बंदोबस्त करण्याचे सूचना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनां याप्रसंगी दिले.

 

तसेच या क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतकाच्या परिवारांला आर्थिक मदत देऊन परीवारांचे सांत्वन केले.

 

यावेळी खा.अशोकजी नेते यांनी वनविभागाचे अधिकारी यांना शासन स्तरावर तातडीने कामे करुन मदत देण्याचे निर्देश देऊन सूचना केल्या.

 

याप्रसंगी खा.अशोकजी नेते, गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्र तथा भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा,प्रदेश सरचिटणीस भाजपा एस.टी , मोर्चाचे प्रकाशजी गेडाम,विजय अग्रवाल,सुरेश राठोड,संभाजी ठाकरे भाजपा कार्यकर्ता, वनविभागाचे विभागीय व्यवस्थापक रुपेश पाटील, वनपरिक्षेत्राधिकारी एस.बी बोथे तसेच वनविभागाचे कर्मचारी व गावातील अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here