Gadchiroli district highlights..26/1072022
दिवाळीच्या तोंडावर तीन दिवस सुट्टया मिळाल्यानंतर सुध्दा,गडचिरोली पोष्ट ऑफिस मध्ये काम करणाऱ्या पोस्ट मास्तर सह तीन कर्मचाऱ्यांनी मुद्दाम कामाच्या दिवशी चौथी सुट्टी घेण्याचा अजब गजब प्रकार काल 25/10/2022 रोजी गडचिरोली पोष्ट ऑफिस मध्ये पाहायला मिळाले.
दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या खात्यातून पैसे काढणारे खातेदार, आरडी एजेंट,किंवा अनेक वृध्छ महिला, पुरुष काल सकाळी पोष्ट ऑफिस मधे आल्यानंतर त्या ठिकाणी फक्त चारच कर्मचारी काम करतांना दिसून आले,त्या पैकी रेल्वे आरक्षण,पारपत्र, स्टॅम्प तिकीट विक्री व इतर एक कर्मचारी असे फक्त चार व्यक्तीचं पोष्ट ऑफिस चा कारभार चालवीत असल्याचे आढळून आल्याने अनेक लोकांना आपली कामे न करताच परत जावे लागले.
काही जागरूक नागरिकांनी आपली अडचण महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी कडे सांगितली असता , पोष्ट ऑफिस मधील अनुपस्थित कर्मचाऱ्यांची माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारली असता त्यांनी एक दिवस सुट्टी घेतली आहे तर काय बिघडले,आणि दिवाळी निमित्त सुट्टी घेणार नाही काय अशी उद्दट मुजोरीच फोन वर केली.चंद्रपूर पोष्ट ऑफिस च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर मागितला तर ते आम्ही देऊ शकत नाही असे सांगितले.या वरून पोष्ट ऑफिस मधील कारभार राम भरोसे असल्याची शंका अनेकांना नक्कीच होत असेल.
महाराष्ट्र माझा न्यूज तर्फे प्रयत्न करून प्रभारी अधिकारी अभिनव सिन्हा यांना मोबाईल वर संपर्क केला असता त्यांनी पण फोन उचलला नाही, या वरून पोष्ट ऑफिस मधील कार्यप्रणाली सुरळीत होत नसल्याचे आढळून आले आहे.
गडचिरोली पोष्ट ऑफिस मधे येणाऱ्या लोकांना चांगली वागणूक, कर्मचाऱ्यांकडून मिळावी अशी अपेक्षा अनेक खातेदारांनी यावेळी व्यक्त केली होती.