गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांना भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन…

0
317

Gadchiroli district highlights..31/10/2022

गडचिरोली.

आज गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याच्या अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मा. खासदार मुकुलजी वासनिक , आमदार सुभाष धोटे , प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नानभाऊ गावंडे सह प्रदेश काँग्रेसचे इतर पदाधिकारी, जिल्ह्यातील काँगेस नेते व शेकडोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते!!

ज्या प्रमाणे सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या सारख्या लोकांनी देशाला एकत्र ठेवण्याचे कार्य केले त्याच प्रमाणे राहुल गांधी हे सुध्दा भारत जोडो यात्रा काढून देशाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत असे मुकुल वासनिक यांनी आपल्या भाषणात सांगितले .

राहुल गांधी यांनी आयोजित केलेली भारत जोडो यात्रा 7 नोव्हेंबर रोजी नांदेड मार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करणार असून,गडचिरोली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी 17 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील बाळापूर या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती, परंपरा दर्शविणारे देखाव्या सह हजारो लोकांनी यात्रेला भेट देण्याचे आवाहन मुकुल वासनिक यांनी केले आहे.

संविधानाची शपथ घेऊन ज्यांनी केंद्रात सरकार बनविली आहे, त्यांनीच आता संविधान बदलविण्याचा षड्यंत्र चालवलेला असून आरएसएस विचारधारेच्या लोकांकडून सावध राहण्याची गरज असल्याचे मनोगत मुकुल वासनिक यांनी व्यक्त केले होते.

राहुल गांधी हे कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत एकूण 3570 किलोमिटर ची भारत जोडो पद यात्रा करणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी यावेळी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here