Gadchiroli district highlights…
नगरसेवक आशिष पिपरे यांच्या मागणीला व पाठपुराव्याला आले यश..!!
दिनांक 20 अक्तोंबर 2022
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी विकासकामांचा प्रस्ताव मंजूर करून शिफारशीसह नगरविकास विभागाला मंजुरीसाठी नुकताच पाठविला होता.
नगरविकास विभागाची मंजुरी मिळाल्यानंतर चामोर्शी शहरातील स्मशानभूमी, स्मशानभूमीकडे जाणारा रोड, मटण मार्केट, गावतलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण, चिचडोह बॅरेज रस्ता, शहरातील सि सि टिव्ही कॅमेरे, चिचडोह बॅरेज बालोद्यान अश्या विविध विकासकामांसाठी जवळपास 20 कोटी चा निधी उपलब्ध होणार आहे हा निधी लवकरात लवकर उपलब्ध व्हावा यासाठी नगरसेवक आशिष अरूण पिपरे यांनी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते यांच्या मार्गदर्शनात वारंवार पाठपुरावा केला व शेवटी त्यांना यश आले व त्यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांनी या विषयावर भेट घेऊन याची खात्री करून घेतली.
लवकरच सदर निधी चामोर्शी शहर विकासासाठी प्राप्त होणार आहे या करिता भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडी जिल्हा गडचिरोली चे वतीने जाहीर आभार व्यक्त करण्यात येत आहे.



