धुळे.14/10/2022
विविध प्रकारच्या शासकीय निम शासकीय विभागाशी निगडीत, सार्वजनिक, सर्वसामान्य लोकांशी निगडित, ज्वलंत समस्या सबंधित विभागांच्या प्रमुखांना अवगत , करुन , त्या समस्यांची सोडवूक करणे, त्यासाठी सुयोग्य मार्गाने पाठपुरावा करण्याची मोहिम, नागरी हक्क् संरक्षण समिती व्दारे राबविली जात आहे। आता पंर्यंत धुळे महा नगपालीका व पोलीस विभागाच्या बैठका झाल्यात , त्याला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
आता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता. मा. श्री. नवले साहेब यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत, सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत, नागरी ,समस्यांचा ऊहापोह, तथा सोडवणूकी संदर्भात, नागरी हक्क सरक्षण समितीची बैठक संपन्न होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाशी सबंधीत, सार्वजनिक समस्या , सुचना, आदि. रविवार दिनांक 26- 10 – 2022 पंर्यत 94227- 76318 या व्हाटसप क्रमांकावर , किंवा ,महेशबाबा घुगे, शेवंता निवास, सदाशिव नगर, स्वामी नारायण मंदिर परिसर, देवपूर या पत्यावर लेखी स्वरुपात,पत्राद्वारे पाठविण्याचे आवाहन, नागरी हक्क संरक्षण समितीचे सरचिटणिस महेशबाबा घुगे यांनी केले आहे.