Gadchiroli district. highlights …
देशातील हजारो निरपराध लोकांची सुटका करण्याची मागणी
आरमोरी : दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन.साईबाबा यांना नक्षलवाद्यांशी असलेल्या कथीत संबंधावरुन २०१७ मध्ये अटक करण्यात येवून त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल सहा वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज त्यांची आणि सहकाऱ्यांची निर्दोष सुटका केली. न्यायालयाच्या या निर्णयाचे आरमोरी येथे फटाके फोडून स्वागत करण्यात आले.
उल्लेखनीय की, प्रा.जी.एन.साईबाबा यांना दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरुन पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी देशभरातील बुद्धिजीवी वर्गाने वेळोवेळी आवाज उठविला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी त्यावेळी गडचिरोली येथे प्रा.जी.एन.साईबाबा यांची जमानत घेतलेली होती. तर ॲड. ॲड.निहालसिंग राठोड व इतर वकिलांची फौज प्रा.जी.एन.साईबाबा यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील होती.
देशभरात भिमा कोरेगाव प्रकरणात अटकेत असलेल्या बुद्धिजीवी सह हक्क आणि अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना शहरी नक्षलवादी म्हणून राजसत्तेने वेगवेगळ्या कारागृहात अटकेत ठेवले असून या कार्यकर्त्यांना सरकारने तातडीने मुक्त करुन मानवी हक्कांची जपणूक करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी केली आहे.