के.के.एक्सप्रेस मध्ये प्रवाशी महिलेची प्रसूती…

0
256

के.के.एक्सप्रेस मध्ये झाली प्रसूती;महिला व बाळ सुखरूप सोलापूर रेल्वे हॉस्पिटलमध्ये

 

सोलापूर : दि.०५ चालत्या ट्रेन मध्ये एका महिला प्रवासीने गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना घडली.

ट्रेन नं. 12627 के.के.एक्सप्रेस मध्ये एका गरोदर प्रवाशी महिलेला अचानकपणे प्रसव वेदना सुरू झाल्या होत्या. पण चालत्या ट्रेनमध्ये काय करणार असा प्रश्न महिलेच्या पतीला पडला होता. ही माहिती ज्यावेळी टिटीई बंनूसिंह मीना यांना मिळाली तेंव्हा लगेच टिटीईने प्रसंगावधान साधून इतर महिला प्रवाशांच्या मदतीने ताबडतोब महिलेची सुखरूप प्रसूती केली.महिला प्रवाशाने एका गोंडस मुलीला चालत्या ट्रेनमध्ये जन्म दिला. बाळ आणि आई हे दोघेही सुखरूप आहेत,रेल्वे प्रशासनाने दोघांना सोलापूर येथील रेल्वे रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

3 ऑक्टोबर रोजी के.के.एक्सप्रेस बंगलोर हुन दिल्ली कडे निघाली होती,सर्व प्रवाशी सुखरूप प्रवास करत होते,असेच एक दाम्पत्य सोलापूर कडे के.के.एक्सप्रेसने निघाले होते. महिला प्रवाशी ही गरोदर होती.सोलापूर रेल्वेस्थानक जसजसे जवळ येत होते,त्यावेळी गरोदर महिला प्रवाशीला प्रसूती वेदना सुरू झाल्या.त्या वेदना पाहून महिलेचा पती चिंतेत पडला.धावत्या ट्रेनमध्ये कशी मदत मिळेल याची चिंता त्याला लागली होती.

संबंधित महिलेच्या पतीने कर्तव्यावर असलेल्या टिटीई बंनू सिंह मीना यांना संपर्क साधला.बनू सिंह मीना हे ताबडतोब संबंधित गरोदर महिला ज्या ठिकाणी बसलेली होती त्या रेल्वे बोगीत गेले, गरोदर महिलेला अत्यंत असह्य अशा प्रसूती वेदना सुरू होत्या.त्यांनी संबंधित महिलेला धीर दिला,लवकरच सोलापूर रेल्वे स्थानक येईल ,असे आश्वासन दिले.इतर महिला प्रवाशांची मदत मागितली.मदतीला आलेल्या महिला प्रवाशांनी साड्या,चादरी हातात घेत,आडोशा धरला.काही वेळातच महिला प्रवाशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.

याबाबत टिटीई बनू सिंह मीना यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून माहिती दिली होती.सोलापूर विभागामधील वाणिज्य अधिकाऱ्यांनी ताबडतोब के.के. एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर येण्या अगोदर डॉक्टरांची फौज तैनात केली होती हे विशेष…

के.के एक्सप्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर येताच बाळंतीण महिलेला आणि बाळाला सुरक्षित रित्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.सदर गरोदर महिलेला मदत करणाऱ्या टी टी ई मीना यांचे कौतुक रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here