आमदार होळी यांच्या वाहनाला ट्रक ची धडक…एअर बॅग मुळे झाला बचाव.

0
698

Gadchiroli.date 5/10/2022

आरमोरी ( प्रतिनिधी ) : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांच्या वाहनाचा अपघात काल रात्री आठ वाजता च्या सुमारास झाला. गडचिरोली येथून आरमोरी तालुकास्थानी दुर्गादेवी दर्शनासाठी जात असताना अपघात झाल्याची घटना घडली.

गाढवी नदीच्या पुलावर रोडच्या मधोमध आलेल्या दुचाकीस्वाराला वाचविताना गाडी ट्रकला धडकली, त्यामुळे हा अपघात झाला होता.

 

या अपघातामध्ये दुचाकीस्वार जखमी झाल्याचं समोर आलं आहे.गाडीमधील एअर बॅग योग्य वेळी उघडल्याने आमदार डॉ. देवराव होळी आणि त्यांचे सहकारी सुरक्षित राहिले, मात्र अपघातात दुचाकीस्वार गंभीर जख्मी असल्याची माहिती मिळाली आहे.

अद्याप दुचाकीस्वाराचे नाव व वास्तव्य कळू शकलेले नाही. अपघात होताच डॉ. देवराव होळी यांनी रुग्णवाहिका बोलावून अपघातग्रस्त युवकाला मदत पोहोचवली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ दाखल झाले होते. आरमोरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here