Gadchiroli.date 5/10/2022
महाराष्ट्र राज्याच्या अंतिम टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त आणि व्यापक जंगलाने तसेच दुर्गम भागातील रस्त्यांच्या अडचणीने व्यापला असताना सुद्धा, कोरोना महामारी पासून सुरक्षित राहण्यासाठी बूस्टर लस घेण्यात जिल्ह्याने प्रथम क्रमांकावर बाजी मारल्याची माहिती आज जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
कोरोणा बिमारी पासून सुरक्षित राहण्यासाठी बूस्टर डोस घेऊन कालपर्यंत फक्त 22 टक्केच लोकांनी प्रतिसाद दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दुसऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा असून, मुंबई हा पाचव्या क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी आज पत्रकारांना दिली आहे.
एकूण 35 जिल्हा पैकी गडचिरोली जिल्ह्याने एक लाख 33 हजार 665 लोकांना बूस्टर डोज देऊन,जिल्ह्याचे नावाने प्रथम क्रमांक पटकावल्याने, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले होते.
ज्या लोकांनी कोरोना लसीचे चे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांनी सहा महिन्याच्या आत बूस्टर डोस घेऊन जास्तीत जास्त लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वप्निल बेले यांचे सह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी केलेले आहे.