नगर पालिकेच्या वतीने महामार्गावर लावलेत झिरो एल ई डी बल्ब….?? नगर पालिकेची कार्यप्रणाली कधी दुरस्त होणार.

0
238
गडचिरोली: सरकारी कामात शून्य नियोजन केल्याचे उदाहरण द्यायचे झाल्यास नक्कीच गडचिरोली नगर पालिकेचे नाव घेतले जाऊ शकते,याचे कारण असे आहे की सध्या गडचिरोलीत मुख्य वर्दलीचे ठिकाण असलेल्या आरमोरी रोड वर नगर पालिकेच्या वतीने लावण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट वर अंधुक प्रकाश देणारे एल ई डी (झिरो) बल्ब लावण्यात आलेले असून या मार्गावर रात्रीच्या वेळेस लाईट चालू असताना सुध्दा अंधार पसरला असल्याची बाब दिसून येत आहे.
स्ट्रीट लाईट लावताना मार्गावर उजेड पडणार नसेल तर नगर पालिकेने केलेली चमकोगिरी कोणत्या कामाची आहे असे शहरातील लोकांकडून सांगितले जात आहे.
या परिस्थितीची पाहणी करून माहिती जाणून घेतली असता,जे लाईट ओपन स्पेस मध्ये लावायचे ठरवले होते तेच लाईट महामार्गावर लावण्यात आल्याचे दिसून आले होते.
अशा प्रकारे शून्य नियोजन करणाऱ्या नगर पालिकेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार असल्याने भविष्यात या मार्गावर मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी नगर पालिकेच्या वतीने घेतली जाईल काय…?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here