जारावंडी आश्रम शाळेतील घटना : परिसरात पोलिसांबद्दल भीतीचे वातावरण…
धानोरा:मी जारावंडी पोलीस ठाण्याचा पीएसआय आहे असे सांगून रात्रौ प्रवास करणाऱ्या वाहनांना अडवून त्यांच्याकडून वाहनांची झळती घेऊन वाहन परवाना आहे काय,लायसन्स आहे का आशा प्रकारे धमकी देऊन नकली पोलीस बनून दोन व्यक्ती अनेकांना लुटत असल्याचे माहीत झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे
एन बी दुधे व शुभम मडावी असे त्या दोन्ही तोतयाचे नाव असून दुधे हे आश्रम शाळा जारावंडी येथील पुरुष अधिक्षक म्हणून तर मडावी हे चौकीदार म्हणून कार्यरत आहेत
जारावंडी येथे दर रविवारी आठवडी बाजार भरतो त्यात जारावंडी पासुण छत्तीसगड राज्य जवळ असल्याने अनेक व्यापारी या आठवडी बाजारात येतात व या मार्गाने अनेक वाहनांचे आवागमन होत अस्तात ,दरम्यान याच मार्गावर शासकीय आश्रम शाळा आहे
त्यात शाळेतील मुलांचे अधीक्षक दुधे हे चौकीदार मडावी सोबत 8/10/2023 ला रविवारी रात्रौ 9-10 वाजताच्या दरम्यान शाळेच्या बाहेर येऊन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून त्याची झडती घेत मी जारावंडी चा पोलीस निरीक्षक आहे तुमच्या कडे वाहन परवाना आहे का? लायसन्स आहे का? परवाना नसल्यास तुमची वाहन जप्त करून कारवाही करण्यात येईल म्हणून त्यांना दमदाटी देत त्यांच्या कडून पैसे मागितले,त्यात दुधे यांनी वाहने थांबऊन झडती घ्यायचा परंतु काही वाहने थांबत नसल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबवत दमदाटी देऊन आताच्या आता तुम्हाला कारवाही करण्यात येईल अशी धमकी देऊन त्यांना वाहनाच्या खाली उतरवून वाहणातील महिलांशी सुद्धा गैरवर्तूनक केल्याचे बोलले जात आहे
दरम्यानच्या रस्त्यावर गावातील नागरिक त्या वाहनाच्या दिशेकडे धाव घेतले असता तेथून दुधे यांनी पोबारा काढला,घटनेच्या दरम्यान त्याच शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनीही मौका स्थळी पोहचले नंतर जाऊन सकाळी मुख्यध्यापकाना सांगून दुधे यांना 24 तासाच्या आत खुलासा सादर करण्याची ताकीद दिली
*या पूर्वीही केली तोतीयागिरी*
नागरिकांच्या माहिती नुसार सदर व्यक्ती या घटनेच्या पूर्वीही अनेकदा असेच तोतया पोलीस बनून अनेक घृणास्पद प्रकरण केल्याचे नागरिकांमधून बोलल्या जात आहे,तरी संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या पूर्वी कोणकोणत्या घटना केल्या याची चौकशी करून करवाहीची मागणी केली आहे
*पोलीस विभागाची बदनामी*
अनेकांनी तोतया पोलीस बनून अनेकांना लुटले तर अनेकांची फसवणूक झाल्याचे पाहायला मिळतात या घटना जास्तीत जास्त शहराच्या ठिकाणी घडतात परंतु गडचिरोली जिल्ह्यातील जारावंडी सारख्या अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त परिसरात घडत असल्याने पोलिसांबद्दल ची गरीमा कमी व्हायला लागली असून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल भीतीचे वातावरण दिसायला लागले आहे
गडचिरोली पोलिसांची आणि नागरिकांची जवळीकता यावी यासाठी पोलीस विभागाने अनेक योजना राबवत आहेत,त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल असलेली गलत भावना कमी होऊन जवळीकता निर्माण व्हायला लागली आहे परंतु अशा तोतया पोलीस बनून पोलिसांची बदनामी करत असल्याने पुन्हा पोलिसांच्या कार्याला काळिमा लागत आहे त्यामुळे अशा तोतया पोलिसांना वेळीच चाप देने गरजेचे आहे