गडचिरोली विशेष प्रतिनिधी.
गडचिरोली: ज्या लोकप्रतिनिधींना आपल्या मतदार संघातले आणि संपुर्ण जिल्ह्यातले प्रश्न दिसून येत नाही.. ऐकू येत नाही किंवा डोळ्यासमोर दिसूनही ज्यांना ते बघायचेच नाहीं त्यांना उदासीन नाही तर काय म्हणणार? गत तीन ते चार वर्षापासून जिल्हयात एस टी बसेसच्या पुरेशा सुविधा नाहीं.. प्रवासी वाहतुकीची संपूर्ण व्यवस्था ही मानव विकास मिशनच्या बसेसवर अवलंबून… प्रवाशांना तर दररोज नाहक त्रास सहनच करावा लागतो मात्र विद्यार्थ्यांची खुप मोठी परवड होत असते. बसेस वेळेवर येत नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत पोहोचता येत नाही त्यात वर्गाचा पहिला तास संपल्यानंतरच विद्यार्थी शाळेत पोहोचतात आणि संध्याकाळी सुट्टीनंतर वेळेवर बस येत नसल्याने घरी सात ते साडे आठ पर्यंत पोहचावे लागते. हा त्रास रोजचाच ही समस्या निर्माण झाली ती गडचिरोली, अहेरी आगारात असणाऱ्या बसेसच्या कमतरतेमुळे.. यामुळे आगार व्यवस्थापक ही हतबल आहेत..
गेल्या दोन वर्षापासून बसेस उपलब्ध करून द्या अशी नागरिक ओरड करत असले तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे ढुंकूनही पाहण्यास तयार नाही…. शेवटी हतबल होवुन आज विद्यार्थिनींनी चक्क एस टी आगारातच आपला ठिय्या मांडला आणि दररोजच्या त्रासदायक प्रवासाची आपबिती मांडत होत्या… त्यांच्या या साध्या प्रश्नांची सोडवणूक लोकप्रतिनिधी करीत नसतील तर त्यांच्या गावात जाऊन मोठमोठे भाषण करताना तुमचे कोणते चित्र त्या चिमुकल्या विद्यार्थ्यासमोर उभे राहत असेल याचा तरी विचार करा… शेवटी त्या चिमुकल्या विद्यार्थ्याना आपल्या हक्कासाठी असे रस्त्यावर यावे लागत असेल तर प्रशासन, लोकप्रतिनिधी किती अकार्यक्षम, असेल याचाच तो पुरावा आहे… जनाची नाही मनाची तरी असेल तर या विद्यार्थ्यांना आपल्या पुन्हा असे रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका म्हणजे झालं.
आज गडचिरोली बस डेपोत शाळेच्या विद्यार्थ्यानी ठिय्या मांडल्याचा हा दृष्य पाहून बघून वैचारिक माणसाच्या अंगावर काटा उभा राहिला असेल यात मुळीच शंका नाही…
बॉक्स…
एबीव्हीपी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनातील मागण्या जाणून घेतल्या आहेत,पण आंदोलन करतांना एबीव्हीपी कडून कुठलाही नोटीस देण्यात आला नव्हता,आम्हाला सहा पत्र दिले आहे हे खोटे आहे,फक्त एक पत्र जिल्ह्यातील शाळांना बसेस उपलब्ध करून देण्यासाठी,कुठलाही गावचा नाव न टाकता मोगम पत्र देण्यात आले होते.या उलट आज आंदोलन करणाऱ्या आयोजकांनी लहान मुला मुलींना मुद्दाम उन्हात बसविल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी समस्त विद्यार्थ्यांना सावलीत बसवून थानेदारांच्या उपस्थितीत योग्य ती चर्चा घडवून आणली आहे. जास्तीच्या गाड्या चालू करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना देण्यात आले आहे…. फाल्गुन राखडे.,आगार व्यवस्थापक गडचिरोली.
बॉक्स..
आंदोलन करण्यात येईल याची कुठलीही माहिती मिळाली नाही,तरी शाळेत जायचं असताना विद्यार्थी आंदोलनात गेले हे चुकीचे आहे ,विद्यार्थी आंदोलनात कसे काय गेले याची माहिती त्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारण्यात येईल.
विवेक नाकाडे, प्राथमिक शिक्षण अधिकारी गडचिरोली.
बॉक्स…
आमच्या शाळेतील विद्यार्थी आंदोलनात सहभागी होणार होते याची कुठलीही माहिती आंदोलनकर्त्यांनी दिलेली नव्हती,या पुढे योग्य ती काळजी घेतली जाईल.
राजाभाऊ मुंघाटे,अध्यक्ष विद्याभरती कन्या विद्यालय गडचिरोली.