गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय भरडाईच्या तांदळात, तेलंगणातील रेशन तांदळाची भेसळ…
बोगस भरडाई दाखवून,वितरण सेठ शासनाला लावतोय करोडोंचा चुना…
पुरवठा विभागाचे मुद्दाम दुर्लक्ष…
गडचिरोली.(सिरोंचा)
गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भाग निसर्गरम्य परिसर असून,या तालुक्यात धार्मिक स्थळे,गोदावरी नदी चा अथांग पसरलेला नदीचा प्रवाह पाहण्यासाठी जिल्ह्यातील लाखो लोकं उत्साहित होतात.
परंतु मागील दोन तीन वर्षापासून सिरोंचा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध रेती,खनीज उत्खनन,अवैध लाकूड कापण्याच्या अवैध व्यवसायामुळे तालुक्याची बदनामी होऊ लागली होती पण आता नव्यानेच उघडकीस आलेला प्रकार म्हणजे शासकीय तांदळाची अवैध मार्गाने शासकीय भरड केंद्रात भेसळ होत असल्याची धक्कादायक बाब जिल्ह्यातील काही पत्रकारांनी उघडकीस आणली.
सिरोंचा शहरापासून असरअल्ली रोड वर अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ,एका मोठ्या गोडाऊन मध्ये, तेलंगाना राज्यातून आणलेला रेशन तांदळाचा साठा करून,त्या तांदळाची विक्री बोगस बिल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बोगस पावत्यांच्या आधाराने, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक शासकीय भरडाई केंद्राला होत असल्याचे दिसून आले आहे.
या तांदळाची अवैध मार्गाने विक्री होत असतांनाही पुरवठा विभाग,तसेच पोलिस विभाग सुध्दा चिरमिरी घेऊन मुद्दाम दुर्लक्ष करीत असल्याची माहिती काही गोपनीय सूत्रांनी दिली होती.
अशा प्रकारे तांदळाची अवैध विक्री गडचिरोली प्रशासनाच्या अप्रत्यक्ष मदतीने होत असल्याची माहिती तपासून पाहण्यासाठी काही पत्रकारांची टीम या गोडाऊन वर दाखल झाली होती,या ठिकाणी पाहणी केली असता, पाच ते सात ट्रक या ठिकाणी तांदूळ भरून नेण्यासाठी आले असल्याचे दिसले,त्यापैकी एका ट्रक मध्ये मजुरांद्वारे तांदळाचे काही कट्टे भरीत असल्याचे दिसून आले होते.या बद्दल त्या ठिकाणी उभे असलेल्या चार पाच लोकांना विचारले असता, त्या लोकांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने,पत्रकारांनी ताबडतोब जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तहसीलदार सिरोंचा यांना मोबाईल वर माहिती दिली,परंतु त्यांच्या कडून कोणतीही कारवाई न झाल्याने सदर तांदळाच्या अवैध विक्री कामात शासकीय अधिकाऱ्यांची खुलेआम मदत होत असल्याचे आढळून आले आहे.
या तांदळाची अवैध विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव वितरण सेठ असून,मागील दोन तीन वर्षापासून कोणतीही भीती न बाळगता राजरोस पणे प्रशासनाच्या अप्रत्यक्ष मदतीने हा कारभार होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या अवैध कामात पुरवठा विभाग,पोलिस विभाग, तालुक्यातील राजकारणी नेते तसेच स्थानिक पत्रकाराची संशयित भूमिका असल्याची माहिती,नाव न सांगण्याच्या अटीवर काही लोकांनी पत्रकारांना दिली होती.
गड़चिरोली जिल्ह्यातील करोडपती राईस मिल मालक,अवैध विक्री करणारा व्यापारी आणि शासकीय अधिकाऱ्यांची ही मिलीभगत, शासनाला किती नुकसानीच्या खाईत नेऊन सोडेल याचा विचार न केलेलाच बरा…