सुरजागढ अवैध खनीज वाहतूकीवर आळा घालण्याची गरज…
Gadchiroli district highlights.30/4/2023
गडचिरोली. शहरापासून अवघ्या चार किमी अंतरावर असलेल्या नवेगाव ग्राम पंचायत आवारात, दुचाकी ला वाचविण्याच्या प्रयत्नात एका भरधाव ट्रकने एका शहीद स्मारकाला जोरदार धडक दिल्याने, दोघांचा मृत्यू आणि ट्रक चालक गंभीर जख्मी झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी बारा वाजता घडली.
दुर्घटनाग्रस्त झालेल्या ट्रक ची माहिती काढली असता,तो ट्रक नेहमी सुरजागढ ते रायपूर येथील खनीज वाहतूकीच्या कामात चालत असून,ट्रक चालक व्याहाड जवळील किसान नगर येथे आपल्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना हा भीषण अपघात घडून आला होता.
या अपघातात गंभीर जख्मी झालेल्या ट्रक चालकाचे नाव पिंटू राजपाल मजोके वय 35 वर्ष रा. किसान नगर असून, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव मुखरू रघु गोमस्कर वय 60 वर्ष रा.मुरखडा व दुसरा मृतक व्यक्ती हा गडचिरोली शहरातून व्याहाड ला जाण्याकरिता त्या ट्रक मध्ये बसलेला होता,त्या व्यक्तीचे नाव काय होते याचा शोध पोलिस प्रशासन घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

गडचिरोली शहरातली बिघडलेली वाहतूक आणि सुरजागढ खनीज वाहतूकीवर चालणाऱ्या गाड्या अजून किती लोकांचा जीव घेणार याचा विचार न केलेलाच बरा…
या अपघाताला कारणीभूत असणारी सुरजागढ वाहतूक बंद करून बिघडलेली वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आवश्यक प्रयत्न प्रशासन करेल काय अशी शंका लोकांनी व्यक्त केली होती.




