मातृदिन साजरा केला मातोश्री वृद्धाश्रमात….

0
168

Gadchiroli district highlights.14/5/2023

गडचिरोली. प्रत्येक कुटुंबात आई नावाची व्यक्ती हयात असते तो पर्यंत त्या कुटुंबात स्त्री ही पुरुषापेक्षा जास्त सुरक्षित आणि निडर पणे आपली भूमिका निभावत असतात, पण अनेक ठिकाणी पत्नीच्या दबावाखाली स्वार्थी मुलांकडून जेव्हा आई चा त्याग करून तिला वृद्धाश्रमात जायला भाग पाडल्या जाते,त्यावेळेस मातृदीवस साजरा कसा करायचा असा विचार अनेकांच्या मनात येऊ लागले असेल.

बहुतेक लोकं आपल्या घरात आई ला ओवाळून मातृदिवस साजरा करतात परंतु वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृध्द महिलांना मदत करण्याचा मानस ठेवत तिला अन्न वस्त्र देऊन त्यांचा आशीर्वाद घेत आज मातृ दिवस साजरा होतांना आज मातोश्री वृद्धाश्रम येथे पाहायला मिळाले .

 गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष तथा आरमोरी येथील निवासी छगन शेडमाके यांनी आज मातृदिवसा निमित्त मातोश्री वृद्धाश्रमात वृध्द महिला,पुरुषांना मदत करून मातृ दिवस साजरा केला.

यावेळेस मातोश्री वृद्धाश्रम चे सचिव सुनील पोरेडीवार,छगन सेडमाके,पत्रकार व्यंकटेश दुडमवार,कैलाश शर्मा यांच्या उपस्थितीत वृद्धाश्रमातील ९ वृध्द महिला पुरुषांना नवीन वस्त्र आणि फरसाण सह काही भेट वस्तू देण्यात आल्या .

या वेळेस छगन सेडमाके यांनी वृद्धाश्रमाची पाहणी केली,तसेच वृद्धाश्रमात राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक मदत यापुढेही करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here