Home राजकीय गडचिरोलीत भाजप आदिवासी मोर्चाला बळ; प्रा. श्रीमंत सुरपाम यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती…

गडचिरोलीत भाजप आदिवासी मोर्चाला बळ; प्रा. श्रीमंत सुरपाम यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती…

0
299

 

गडचिरोली :

भारतीय जनता पक्ष (भाजप)च्या आदिवासी मोर्चात संघटनात्मक बळकटी देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील आदिवासी मोर्चाच्या कामकाजाला नवे बळ मिळणार असल्याचे पक्ष वर्तुळात बोलले जात आहे.

ही नियुक्ती आदिवासी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. तसेच भाजप गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन कोडवते यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.

नियुक्तीनिमित्त गडचिरोली येथील सर्किट हाऊस गडचिरोली येथे छोटेखानी पण उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. रमेश बारसागडे व डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते प्रा. सुरपाम यांना पक्षाचा दुपट्टा परिधान करून नियुक्तीपत्र देत सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, भाजप महामंत्री विनय मडावी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, कृष्णा गजबे, महामंत्री प्रकाश गेडाम, तसेच डॉ. नितीन कोडवते आणि डॉ. चंदा कोडवते यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, प्रा. श्रीमंत संतोष सुरपाम यांनी आपल्या नियुक्तीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. त्यांनी या संधीचे श्रेय डॉ. देवराव होळी, प्रा. रमेश बारसागडे, डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. नितीन कोडवते, माजी खासदार डॉ. अशोक नेते, कृष्णा गजबे, डॉ. नामदेव उसेंडी, प्रकाश गेडाम आणि विनय मडावी यांना दिले.

प्रा. सुरपाम यांनी सांगितले की, आदिवासी समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देत पक्ष संघटना गावपातळीपर्यंत अधिक सक्षम करण्यासाठी ते पूर्ण क्षमतेने काम करतील आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रसार अधिक व्यापक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here