गडचिरोली : आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात राजकीय हालचालींना मोठी गती मिळाली आहे. नामांकन दाखल करण्याचा आज दुसरा दिवस असून विविध प्रभागातून उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद दिसून आले आहेत.
आज पर्यंत एकूण 8 उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.
पहिला दिवस : बाळकृष्ण टेंभुर्णे यांचे एकमेव नामांकन…
11 नोव्हेंबर रोजी नामांकन प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी बाळकृष्ण असुराज टेंभुर्णे यांनी सर्वप्रथम अर्ज दाखल करत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली.
प्रवर्ग : अनुसूचित जाती (SC) प्रभाग : 13 (अ)
पहिल्या दिवशी एकच अर्ज दाखल झाल्याने वातावरण शांत होते; मात्र दुसऱ्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी दिसून आली.
दुसरा दिवस : सात उमेदवारांचे अर्ज दाखल — प्रभागांमध्ये चुरस वाढली
आज रोजी दुसऱ्या दिवशी विविध प्रभागांतून एकूण सात उमेदवारांनी अर्ज दाखल करत निवडणुकीची रंगत वाढवली. विविध प्रवर्गातील उमेदवारांनी सक्रियता दाखवत प्रभागात मोठ्या समर्थकांसह अर्ज दाखल केले.
आज 14 नोव्हेंबर 2025 रोजी दाखल झालेले उमेदवार व प्रभाग…
1️⃣ नीता प्रमेंद्र सहारे,प्रवर्ग : सर्वसाधारण महिला,प्रभाग : 2 (ब)
2️⃣ सोनल शत्रूगण नन्नावरे,प्रवर्ग : अनुसूचित जमाती महिला (ST) प्रभाग : 4 (अ)
3️⃣ श्रीकांत शरदराव देशमुख,प्रवर्ग : सर्वसाधारण प्रभाग : 4 (ब)
4️⃣ मिनाक्षी प्रफुल रामटेके,प्रवर्ग : अनुसूचित जाती महिला (SC महिला) प्रभाग : 5 (अ)
5️⃣ रमेश श्रीहरी चौधरी,प्रवर्ग : मागासवर्ग प्रभाग : 6 (अ)
6️⃣ नमिता सुनील वाघाडे,प्रवर्ग :सर्वसाधारण महिला प्रभाग 13 (क)
7️⃣ देवाजी महागु लाटकर,प्रवर्ग : अनुसूचित जाती (SC)प्रभाग : 13 (अ)
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारण तापले…
गडचिरोली नगर परिषद निवडणूक स्थानिक राजकारणात महत्त्वाची मानली जाते. विविध पक्षांचे संभाव्य उमेदवार सक्रिय झाले असून प्रभागांमध्ये संपर्क मोहीम, प्रचार रणनीती आणि मतदारांशी संवाद वाढला आहे. आगामी दिवसांत आणखी अनेक उमेदवार अर्ज दाखल करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नगर परिषद प्रशासन कार्यालय परिसरात दोन दिवसांपासून उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी दिसत असून निवडणुकीची हवा शहरात अधिकच दाट होत आहे.




