गडचिरोली :
गडचिरोली शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा भूकंप घडवत शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष राकेश रत्नावार यांनी आज शेकडो कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
प्रभाग क्रमांक ५ छत्रपती शाहूनगरमधून उमेदवारी जाहीर…
पक्ष प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार यांनी राकेश रत्नावार यांची प्रभाग क्रमांक ५ – छत्रपती शाहूनगर येथून अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली.
यावेळी अतुल गण्यारपवार यांनी रत्नावार तसेच त्यांच्या सोबत आलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दुपट्टा देऊन पक्षात स्वागत केले.
शेकडो कार्यकर्त्यांचा रत्नावारांसोबत पक्षप्रवेश — काँग्रेसची घडी विस्कटली…
राकेश रत्नावार यांच्या प्रवेशाने काँग्रेसच्या शहर संघटनेला मोठा धक्का बसला आहे.
रत्नावार हे गडचिरोली शहरात प्रभावी संघटक म्हणून ओळखले जातात.
त्यांच्या नेतृत्वामुळे शेकडो कार्यकर्ते, महिला पदाधिकारी व वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दाखल झाल्याने काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात खालील प्रमुख पदाधिकारी सामील झाले :
बेबीबाई कुमरे,वैशालीबाई सातपुते,अनिताबाई डोईजड,राजू भारती,विनायक चिचघरे,पुरुषोत्तम सिडाम,किशोर सोनवाणे,पंढरी पाटील डोमळे,सुरेश श्रुंगारपवार,अमोल तोडेवार यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण व महिला कार्यकर्त्यांनीही पक्ष प्रवेश केला.
या भव्य प्रवेश सोहळ्याला पक्षाचे विविध विभागांतील नेते आणिओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष शेमदेवजी चापले,जिल्हा उपाध्यक्ष नईमभाई शेख,शहराध्यक्ष एजाज शेख,अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष हुसेनभाई शेख,जिल्हा उपाध्यक्ष संजयजी श्रुंगारपवार तसेच इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गडचिरोलीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाला मोठा बळ…
या मोठ्या प्रवेशामुळे गडचिरोली शहरातील निवडणूक वातावरण तापले असून,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आता अधिक बळकट स्थितीत दिसत आहे.
आगामी नगर परिषद निवडणुकीत या घडामोडींचा मोठा प्रभाव पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा जोरात आहे.




