Gadchiroli district highlights..4/1/2023
व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची बैठक आज 3 जानेवारी 2023 रोजी विश्रामगृह इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे घेण्यात आली.
गडचिरोली येथे झालेल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या सभेत व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेची जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.
सभे मध्ये जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना विमा संरक्षण देणे हे प्राथमिक लक्ष ठेवण्यात आले असून येत्या 26 जानेवारी 2023 पर्यंत जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सदर विमा करिता संघटनेने एक मताने प्रस्ताव स्वीकारला आहे.
आज झालेल्या सभेत व्हॉईस ऑफ मीडिया(vom) या संघटनेची कार्यकारिणी पुढील प्रमाणे ठरविण्यात आहे.
या मध्ये जिल्हा अध्यक्षपदावर व्यंकटेश दुडमवार, कार्याध्यक्ष पदावर नसीर हाशमी व महेश गुडेट्टीवार , उपाध्यक्ष पदी आनंद दहागावकर, नंदकिशोर वैरागडे, शरीफ कुरेशी, क्रिष्णा वाघाडे,सरचिटणीस कैलास शर्मा, सहसरचिटणीस मुक्तेश्वर (बाळू) म्हशाखेत्री, खजिनदार/कोषाध्यक्ष संदीप कांबळे, कार्यवाहक,किशोर खेवले,निलेश सातपुते, संघटक, सतीश राचर्लावार,विनोद नागपूरकर, गोविंद चक्रवर्ती,राजू सहारे, प्रवक्ता,विष्णू वैरागडे,प्रसिद्ध प्रमुख दुर्योधन तरारे, कार्यकारिणी सदस्य नितीन ठाकरेे, दिगांबर जवादे, सचिन जिवतोडे यांचा समावेश करण्यात आला आहे.
व्हॉइस ऑफ मीडिया देशातील 23 राज्यांमध्ये अठरा हजार सदस्य असलेली संघटना आहे. या संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राज्याध्यक्ष राजा माने व प्रख्यात साहित्यिक यशवंत मनोहर हे संघटनेचे मार्गदर्शक आहेत.
संघटनेने पत्रकारांना दहा लाखाचे विमा कवच देण्याची सुरुवात बुलडाना येथील अधिवेशनातून करण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवन व हाऊसिंग सोसायटीसाठी व्हॉइस ऑफ मिडिया पुढाकाराने साकारली जाणार आहे.
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे लोकशाहीची मूल्ये संवर्धन करण्यात पत्रकारांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये पत्रकारांनी सहजपणे सत्य समोर मांडले पाहिजे. जेव्हा संघर्ष उद्भवतो तेव्हा पत्रकारितेने लोकशाहीची मूल्ये संवर्धना करण्याची भूमिका घेऊन संविधानाचे पालन केले आहे. पत्रकार हा केवळ व्यवस्थेवर अंकुश ठेवणारा डोळा नसून तो समाजाचा मेंदू म्हणून काम करणे अपेक्षित असते. पत्रकारिता क्षेत्रांमध्ये नव्याने प्रवेश करणारे मीडिया हाऊस व कार्पोरेटर्स यांचा हेतू तपासण्याची गरज असून, जेथे कार्पोरेटर प्रवेश करतात तेथे नफेखोरी व व्यापारी व्यक्तीला चालना मिळते व त्यातून पत्रकारितेचा दर्जा आणि गुणवत्ता याचा ऱ्हास होतो.
व्हॉईस ऑफ इंडिया हिनपत्रकारांच्या न्याय हक्कासाठी झटणारी संघटना असून, व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेने अल्पावधीतच देशभरातील 23 राज्यांमध्ये विस्तृत जाळे निर्माण केले आहे. याशिवाय पत्रकारांचे न्याय हक्क, सकारात्मक पत्रकारिता, पत्रकारांच्या आरोग्य, घरांचे प्रश्न, यासह मुलांचे शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रातील नवीन आव्हाने या विषयावर संघटना काम करणार आहे. याकरिता संघटनेने थेट कृती कार्यक्रम हाती घेतला असून अविश्रांतपणे तो चालविला जाणार आहे.
संघटनेने पत्रकारांच्या हितासाठी कृती कार्यक्रम हाती घेतला असून, लवकरच त्याची अमलबजावणीठी संपूर्ण राज्यात होईल. राज्यात संघटन मजबुतीचे काम करणेसाठी सर्वांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ही संघटना देशात उभी राहत असलेली पत्रकारांच्या हक्कासाठीची एकमेव चळवळ आहे. या माध्यमातून पत्रकारांचे हित निश्चितपणे जोपासले जाईल.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटलं जाणाऱ्या पत्रकारांसमोर अनेक आव्हाने आहेत. इतर स्तंभांच्या तुलनेत त्याचे आर्थिक बाजू अत्यंत कमकुवत असते. तरीही रात्रंदिवस एक प्रहरी म्हणून ते समाजात काम करीत असतो. पत्रकारांच्या हाऊसिंग सोसायटी संदर्भात येणारे प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी संघटना निश्चितपणे प्रयत्न करून ते पूर्णत्वास नेणार आहे.
सध्या संघटनेने पत्रकारांच्या विमा पॉलिसी साठी पुढाकार घेतला असून, यापुढे पत्रकाराच्या आरोग्य, घरे, मुलांचे शिक्षण या विषयात मदत करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकार निधी उभारण्याची संकल्पना आहे. त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे.
संघटना सकारात्मक पत्रकारितेसाठी पुरस्कार वितरण करण्याची ही नियोजित आहे. पत्रकारांसाठी पुरस्कारांचे आयोजन करण्याची घोषणा करुन सकारात्मक लिखाण करण्याची भावना वाढीस लागावी व चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन मिळावे ही भूमिका संघटनेची असून लवकरच या विषयीच्या कार्यास सुरुवात होईल.
सामान्य माणसाला पत्रकारांचा आधार वाटतो. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर समाजाची भिस्त असून, लोकशाही धोक्यात आली हे सांगण्यासाठी न्यायाधीशांना पत्रकारांकडेच यावे लागते. त्यामुळे लढवय्या पत्रकाराला देखील सांभाळण्याची जबाबदारी समाजाने घेतली पाहिजे. व्हॉइस ऑफ इंडिया या संघटनेने पत्रकारांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम हाती घेतले असून ते कौतुकास्पद आहे आसे उद्गार जिल्ह्याचे नव नियुक्त अध्यक्ष व्यंकटेश दुदुमवार यांनी काढले.
जिल्हा संघटना गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यात पत्रकार संघटन मजबुतीकरण करण्याचे काम करणार असून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी संघटनेत सामील होवून पत्रकारांच्या न्याय हक्क करिता सक्रिय सहभाग नोंदवावा असे ही आव्हान या वेळी करण्यात आले.