Gadchiroli.12/11/2022
गडचिरोली मुख्यालय पासून अवघ्या वीस कि.मी.अंतरावर असलेल्या अमिर्झा गावात,आपल्या शेतात धान कापणीला गेलेल्या महिलेला नरभक्षक वाघाने शिकार केल्याची घटना सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली.
वाघाच्या हल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव मंदा संतोष खाडे वय 32 वर्ष असून ती महिला आपल्या शेतात धानाच्या कापणी करवून घेण्यासाठी गावाच्या वेशीवर असलेल्या आपल्या शेतात गेल्यामुळे दुर्दैवाने दबा धरून बसलेल्या वाघाने या महिलेला फरफडत नेत शिकार करून डावा पाय च तोडून निघून गेला होता.
सदर महिला वेळेवर घरी न पोहचल्याने,गावकऱ्यांनी शोधाशोध केल्यावर सदर महिलेच्या साडीचा तुकडा मिळून आल्याने वाघाने शिकार केल्याची खात्री गावकऱ्यांना झाली होती.
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती. घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.