गडचिरोली : बच्चू कडू यांचा उद्या जिल्हा दौरा…

0
55

 

 

गडचिरोली : शेतकरी कर्जमाफी, निराधार, दिव्यांग, मजूर, मच्छीमार, मेंढपाळ तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू हे उद्या (दि. २४ सप्टेंबर) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

 

या दौऱ्यात त्यांची संघर्ष यात्रा गडचिरोलीजवळील पारडीसह आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव, देसाईगंज तालुक्यातील कुरूड या ठिकाणी पोहोचणार आहे. तसेच आरमोरी येथे दिव्यांग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

कार्यक्रमाचे वेळापत्रक :

 

सकाळी ११ वाजता – चंद्रपूरवरून संघर्ष यात्रा पारडी येथे दाखल

 

डोंगरगाव बस थांब्यावर स्वागत

 

दुपारी १ वाजता – आरमोरीतील साई दामोधर मंगल कार्यालयात कार्यक्रम

 

दुपारी २.३० वाजता – आरमोरी येथे दिव्यांग मेळावा

 

सायं. कुरूड येथे मारोती मंदिर, झुरे मोहल्ला दर्शन

 

रात्री ७ वाजता – आरमोरीतील इंदिरा गांधी चौक, टिळक चौक येथे देवीदर्शन

 

 

या दौऱ्यातील सर्व कार्यक्रमांना प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here