“भारत जोडो” यात्रा ही काळाची गरज….महेश घुगे.

0
169

Dhule district highlights..1/11/2022

भारतात लोकशाही आहे तशी ती जगातील विविध देशात आहे .पण भारतीय लोकशाहीत आणि ईतर देशांच्या लोकशाहीत अमुलाग्र फरक आहे. ईतर देशात एकाच धर्माचे, एकाच संस्कृतीचे, एकाच भाषेचे, एकाच पेहरावाचे लोक रहातात, भारतात मात्र विविध थर्माचे, विविध पंथाचे विविध जातीचे विविध संस्कुतीचे, विविध भाषेचे लोक रहातात.त्यामुळे भारतातील लोकशाही अबाधित ठेवायची ,म्हणजे, तारेवरची कसरत आहे.

 

ही कसरत करण्यात कांग्रेस गेल्या सत्तर वर्षात यशस्वी ठरत आली आहे. मात्र भाजपाच्या राजवटीत या एकतेला धोका पोहचविणारी धोरणे धोरणे राबविली जात असल्याने ,या आव्हानात्मक परिस्थितीत भारत एकसंघ रहाणे, संघटीत रहाणे गरजेचे आहे.नव्हे तर ती काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन, राहुल गांधी यांनी “भारत जोडो ” यात्रेचे आयोजन केले आहे.

देशातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. आपणही या पुण्य कर्मात सहभाग घेणे आवश्यक आहे.

महेशबाबा घुगे. ( जेष्ठ पत्रकार ) जिल्हा समन्वयक प्रशिक्षण, आणि प्रबोधन। धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here