शेतात राबणाऱ्या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू…

0
354

Gadchiroli district highlights…

Date.21/10/2022

गडचिरोली शहरापासून अवघ्या सोळा किमी अंतरावर असलेल्या पोर्ला या गावात शेतात काम करणाऱ्या महिलेला सापाने दंश केल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी बारा वाजता घडली.

सर्पदंशाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव उर्मिला विलास मोहूर्ले वय 40 वर्ष असून, ती महिला तीळ कापायला शेतात गेली होती,तील कापत असताना झुडपात बसलेल्या सापाने चावा घेतल्याने,गंभीर  महिलेला सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते,परंतु उपचार सुरू असतानाच अचानक प्रकृती गंभीर होऊन सायंकाळी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

सायंकाळ झाली असल्याने शवविच्छेदन उद्याला करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.गडचिरोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here