सार्वजनिक विभागाच्या ऊणीवा जरुर दाखवा , पण ईतरांच्या चुकांचे खापर आमच्या माथी मारु नका..

0
239

Dhule district highlights…22/10/2022

नागरी हक्क संरक्षण समितिच्या बैठकीत अधिक्षक आभियत्यांचेप्रतिपादन. 

धुळे. :- धुळे शहरातील गांधी पुतळा ते नगाव बारी पंर्यतच्या रस्त्याचे ऊत्तरदायित्व सार्वजनिक बांधकाम विभागाचेचआहे , पण त्या रस्त्याच्या धुळधानीला सार्वजनिक विभाग जबाबदार नाही , ईतरांच्या चुकीचे खापर आमच्यावर फोडू नका ,असे आवाहन , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक नवले, यांनी नागरिक हक्क संरक्षण समितिच्या पदाधिकार्यांशी चर्चा करतांना केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरी हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकार्यांची , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक नवले यांच्या दालनात, नवले यांच्या प्रमुख ऊपस्थित संयुक्त बैठक संपन्न झाली

नागरी हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष हिरालाल ओसवाल, , सरचिटणिस महेश घुगे, डॉ. जगदिश गिंदोडीया, ऊत्तमराव पाटील, प्राचार्य डॉ. विलास पाटील, दोन नेश गिंदोडियां इंजि. आशिश अग्रवाल, , प्रा. पवार, अँड. .जगदेव, अँड. चंद्रकांत येशिराव, ह.भ.प. महेंद्रमहाराज राजपूत,आदीं फदाधिकार्यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.

नागरी हक्क संरक्षण समितीचे सरचिटणिस महेश घुगे यांनी सुरवातीला सार्वजनिक बांधकाम विभिगाशी निगडीत वीस समस्यांचे व मागण्यांचे निवेदन अधिक्षक आभियंता विवेक नवले यांना सादर केले.

चर्चेच्या दरम्यान , सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील, धुळे शहरातील गांधी पुतळा ते नगाव बारी या महत्वपूर्ण रस्त्याची दुरावस्था अधिक्षक अभियंत्याना अवगत करण्यात आली,

सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच अखत्यारीत आहे, पण धुळे महानगर पालीकेच्या माध्यमातून केल्या जात असलेल्या भूमिगत मैला वाहून नेणार्या गटारीचे काम M G P कडे महानगर पालीकेने सोपविले आहे. हे काम सदोष असल्याने आय टी आय परिसात गळती होते , ही गळती थांबविल्या शिवाय रस्याच्या तंदुरुस्तीचे काम अशक्य आहे. सदर काम करण्यासाठी , आम्ही परवानगी देतांना , भूमिगत गटारीचे काम पूर्ण होताच , सदर रस्ता पूर्वी प्रमाणेच तंदुरुस्त करण्याची अट घातली होती. MGP महानगर पालीका यांच्यात  पेमेंट वरुन वाद ऊदभवल्याने काम प्रलंबीत आहे. पण त्याचे खापर मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागावर फोडले जात असल्याची खंत या वेळी विवेक नवले यांनी बोलून दाखविली.

या रस्त्याचा ऊजवीकडचा भाग, म्हणजे नगांव बारी ते गांधी पुतळ्या पंर्यतचा रस्ता सार्वजनिक बाधकाम विभाग येत्या दहा दिवसात तंदुरुस्त करुन देणार असल्याची माहितीही अधिक्षक अभियंत्यांनी या वेळी दिली. गांधी पुतळा ते नगाव बारी पंर्यतचा रस्त्याच्या तंदुरुस्तीला 85 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे .हा निधी जर शासनाने आम्हाला ऊपलब्ध करुन दिला तर, , गळतीचा दोष दुरुस्त करुन देण्याच्या अटीवर सार्वजनिक बाधकाम विभाग हा रस्ता दुरुस्त करुन देऊ शकेल, असेही नवले यांनी नागरी हक्क समितिला आश्वासित केले.

रस्त्यावरील दोषयुक्त गतीरोधकामुळे अपघात होत असतात. गती रोधक कसे असावे या बाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असल्याचे सागण्यात आले.

सार्जनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील शासकीय ईमारतीच्या देखभालीची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे पण, वेळो वेळी सूयीग्य पद्धतीने निगा राखण्याची जबा बदारी सबंधित आस्थापणाची असते. कारणपरत्वे तशी निगा राखली जात नाही, त्यामुळे अशा ईमारतींची दुर्दशा होते. असेहीक्षनवले यांनी स्ष्ट केले.

दगड हे नैसर्गिक ऊत्पादन आहे, लोखंग , सिमेंट आदी वस्तु या अनैसर्गिक वस्तु आहेत याचा स्विकार निसर्ग करित नसतो. परिणामतः अशा वस्तुपासून निर्मित ईम रतीचे आयुष्य दगडी बांधकामापेक्षा कमी असते, प़ाझराक्षनदीवरील ,ब्रिटीश कालीन मोठा पूल हे तँयाचे ज्वलंत ऊदाहरण आहे. या पुलाचे आयूष्य संपल्या बाबत ब्रिटिश प्रशासनाने पत्र पाठविले आहे , हा भपंकपणा आहे. ती अफवा आहे.

 

रस्त्याच्या कडेला व मधोमध कोणती झाडे लावावित याचे नियम व बंधनै आहेत, अन्यथा जनावरे झाडे खातांना अपघात होतात, राष्ट्र पुरुषांचे पुतळे, स्मारके साठी शसनाच्या अटी शर्थी असतात, बांधकाम विभागा च्या आखत्यारीतील रस्त्यांच्या दुतर्फा झालेली अतिक्रमणे काढण्याची मोहीम नजिकच्या काळात राबविली जाणार असल्याचेही नवले यांनी सागितले.

नागरि समस्या ऊजागर करुन ,त्या सोडविण्याचा, नागरी हक्क संरक्षण समितीचा ऊपक्रम स्तुत्य असल्याचा आभिप्राय विवेक नवले यांनी बोलतांना नोंदविला. शेवटी महेश घुगे यांनी आभार मानलेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here