गडचिरोली कलेक्टर आणि एसपींना , मानवी हक्क आयोगापुढे हजर होण्याचे समन।

0
716
ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन ने केली होती तक्रार।

Gadchiroli district highlights..
Date.15/10/2022
गढ़चिरौली- कोरोना काळात बिजेपी ने भाजपा चा स्थापना दिवस साजरा करुन कोविड 19 च्या नियमांची पायमल्ली केली व राष्ट्रीय आपत्ति निवारण अधिनियम 2005 चे उलंघन केल्याप्रकर्णी स्थानिक आमदार देवराव होळी सह इतर कार्यकर्त्यां
विरुद्ध गुन्हा नोंद करण्याबाबत मा. विनय बांबोळे राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन यांनी तक्रार दाखल केली होती। मात्र पोलिस प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यामुळे मा. राज्य मानवाधिकार आयोग, मुंबई यांचे कड़े तक्रार दाखल केल्यावरून मां. राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेवून मां. जिल्हाधिकारी, गढ़चिरोली तथा मां. जिल्हा पोलिस अधिक्षक, गढ़चिरोली यांना दि.18/11/2022 रोजी वयक्तिक हजर राहून उत्तर दाखल करण्याचे समन बजावले आहे।

सर्वसामान्य जनतेला कोविड काळात वेठिस धरणा-या प्रशासनाने स्थानिक आमदार व भाजपच्या कार्यकर्त्यांना सुट का दिली याबाबतचे जवाब राज्य मानवाधिकार आयोग मुंबई यांनी मागवून सर्वसामान्य जनतेला कायद्याबाबतची संवेदनशीलता दाखवून दिली आहे। सर्व जनतेचे लक्ष पुढील कार्यवाही कडे लागलेले आहे।

जिल्हाधिकारी संजय मीना यांचे प्रतिवेदन…

मला अजून पर्यंत कुठलाही समन्स मिळालेला नाही,या विषयावर येणाऱ्या सोमवारी सविस्तर माहिती मी देणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here