प्रा.जी.एन.साईबाबा यांच्या निर्दोष सुटकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती…❓❓

0
248

Gadchiroli district highlights…

Date.15/10/2022

गडचिरोली : दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जी.एन.साईबाबा यांना नक्षलवाद्यांशी असलेल्या कथीत संबंधावरुन २०१७ मध्ये अटक करण्यात येवून त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. तब्बल सहा वर्षांनंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कालच त्यांची आणि सहकाऱ्यांची निर्दोष सुटका केली होती.

 

परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशाचे विरूध्द सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे उप मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर केले होते,त्यावरून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केली असून,काल उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने आज दुपारीच स्थगिती दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

उल्लेखनीय की, प्रा.जी.एन.साईबाबा यांना दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरुन पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी देशभरातील बुद्धिजीवी वर्गाने वेळोवेळी आवाज उठविला होता. तर ॲड. ॲड.निहालसिंग राठोड व इतर वकिलांची फौज प्रा.जी.एन.साईबाबा यांच्या सुटकेसाठी प्रयत्नशील होती.

 

काल उच्च न्यायालयाचा आदेश मिळताच पोलिस यंत्रणा सक्रिय करण्यात आली असल्याची चित्रे आज गडचिरोलीच्या पोलिस विभागात दिसून आली असून,या विषयावर पोलिसांनी कमालीची गुप्तता बाळगली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांच्या तपासाला योग्य न्याय मिळाला असल्याची भावना पोलिसांमध्ये आज दिसून येत होती.

नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व उपाययोजना पोलिसांकडून केली जात असताना संबंधित आरोपी लोकांचे निर्दोष सुटण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातील हे भविष्यात येणाऱ्या काळात दिसून येईलच…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here