गडचिरोली- 17/10/2022
आष्टी जवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून स्कारपीओ वाहन उलटल्याची घटना आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
गोंडपीपरी कडून आष्टीकडे येणारे स्कारपीओ वाहन क्रमांक MH 20 DV 3711 वैनगंगा नदीच्या पुलावर येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन नदीत कोसळले.यात चालकाचा जागीच मृत्यू झाला.हे वाहन नेमके कुणाच्या मालकीचे हे कळू शकले नसून मृत वाहनचालकाचे नाव अद्यापपर्यंत कळू शकले नाही.
या गाडीत चालक हा एकटाच होता.घटनेची माहिती कळताच आष्टी व गोंडपीपरी पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला होता. पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे.