वाघाच्या हल्यात सिंधी तोडणारा व्यक्ती ठार..
आरमोरी ते वैरागड रस्त्यावर असलेल्या रामाला गावात एका 55 वर्षीय व्यक्तीला वाघाने शिकार केल्याची घटना आज सकाळी दहा वाजता घडली. वाघाच्या हल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आनंदराव दुधबळे वय 55 वर्ष असून हा व्यक्ती आपल्या शेतातील धानाचे भारे बांधण्यासाठी सिंधी तोडायला जंगलात गेलेला होता.
वारंवार मनाई करण्यात आल्यानंतर सुध्दा मुद्दाम दुर्लक्ष करून जंगलात गेल्यामुळे कालच आरमोरी जवळील देशपुर येथील रहिवासी वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना घडली असून सुध्दा, दुर्दैवाने आज पुन्हा एका व्यक्तीचा मृत्यु वाघाच्या हल्यात झालेला दिसून आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा आणि वन विभागाची यंत्रणा घटनास्थळी पोहचलेली होती घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.