काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाची वर्षपूर्ती रक्तदानाने साजरी…

0
170
२५रक्तदात्यांनी केले रक्तदान…

 

गडचिरोली: ६ ॲाक्टोबर २०२२.

सामजिक कार्याची जाण असणारे गोरगरिबांच्या मदतीला सदैव तत्पर व नेहमीच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून पक्षात व कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण करणारे गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे युवा तडफदार अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कारकिर्दीला 6 ऑक्टोबर रोजी 1वर्ष पूर्ण झाले. याचेच औचित्य साधून अनुसूचित जाती काँग्रेस सेल व इतर विभागाच्या वतीने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली इथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी स्वतः रक्तदान करत आपल्या जिल्हाध्यक्ष पदाची वर्षपूर्ती साजरी केले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा जिल्हा प्रभारी डॉ.नामदेव किरसान, शहराध्यक्ष सतिश विधाते, जिल्हा कोषाध्यक्ष अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, प्रदेश महासचिव युवक काँग्रेस विश्वजित कोवासे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, सुरेश भांडेकर, हरबाजी मोरे, अब्दुल पंजवाणी, जितेंद्र मूनघाटे, रुपेश टिकले, प्रभाकर कुबडे, वसंत राऊत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम सह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महेंद्र ब्राम्हणवाडे यांना जिल्हाध्यक्ष म्हणून 1 वर्षाची यशस्वी जबाबदारी पार पाडल्या बद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या रक्तदान शिबिरात प्रणय भोयर, श्रीकृष्ण लोणबले, विजय मडावी, शुभम निसार, अभिजित हजरा, समीर निसार,पराग जेंगठे, सनातन किर्तनीया, ढिवरू मेश्राम, सावन देवळी, ढिवरू मेश्राम, अजय गेहलोत, सावन देवळे, यश कुसाम, अनिल चव्हाण, अमित चुधरी, राकेश गेडाम सह इतर रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here