Date.१०/१०/२०२२
बुलढाणा- भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत बुलढाणा येथील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना बुलढाणा-चिखली राज्य महामार्गावरील येळगाव नजीकच्या वळणावर आज रविवारी घडली.
विनोद काशिनाथ पाटील (५५, रा. सुंदरखेड, ता. बुलढाणा) असे मृतकाचे नाव आहे. पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेत उपनिरीक्षकपदी कार्यरत पाटील यांनी सुमारे ३ महिन्यापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर ते नजीकच्या सुंदरखेड येथे स्थायिक झाले होते. आज रविवारी दुपारी ते पूजेचे निर्माल्य टाकण्यासाठी दुचाकीने येळगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या (एमपी ०९- ८०४४ क्रमांकाच्या) मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यानंतर नजीकच्या खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेनंतर ट्रक जागीच उभा करून चालक पसार झाला.पुढील तपास पोलिस यंत्रणा करीत आहे.