Gadchiroli. date 21/9/2022
गडचिरोली शहरात दोन्ही महामार्गाचे काम कासवगतीने होत असल्याने,या दोन्ही रस्त्यांवर चालणाऱ्या लोकांना किती त्रास होत असेल त्याचा विचार न केलेलाच बरा…
एकतर कामे हळुवार करायची त्यात निकृष्ट दर्जाची,आणि कामाच्या अंदाजपत्रकात तरतूद केलेल्या नियम प्रमाणे करायचीच नसतील किंवा,या राज्यात कायद्याची मायबहिन करण्यासाठी काही उदाहरणं द्यायचे असेल तर त्या ठिकाणी गडचिरोली शहरातील गडचिरोली ते आष्टी महामार्गाचे उदाहरण दिले पाहिजे…
गडचिरोली ते आष्टी महामार्गावरील बिघडलेल्या वाहतुकीमुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला असल्याची आठवण अजून हि कित्येक कुटुंबांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाल्याने आता हा महामार्ग बांधकाम किती लोकांची घरे उद्ध्वस्त करणार हे इश्र्वरालाच ठाऊक असेल असे वाटायला लागले आहे.
गडचिरोली शहरात लागून असलेल्या चामोर्शी मार्गावर अनेक ठिकाणी रोडच्या कडेला गट्टू लावण्याचे काम चालू असल्याचे महाराष्ट्र माझा न्यूज च्या प्रतिनिधीला काल दिसून आले होते,त्या कामात रोड च्या बाजूला लागून असलेल्या गडर वर जाण्यासाठी प्रत्येक दुकान,आणि घरासमोर उतार देण्यात आलेले दिसून येतो आहे.त्यामुळे अचानक रोड वर निघण्यासाठी उतावीळ वाहन चालकांना,किंवा लहान दुचाकी धारकांना, महामार्गावरून जाणाऱ्या मोठ्या वाहनांना सुध्दा मोठी खबरदारी घेण्याची गरज भासणार आहे.
अशा प्रकारे बिनडोक ठेकेदार, व अभियंता हेच, या शहरात पुढे होणाऱ्या मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरणारे दिसून येतील यात काही शंकाच नाही. महामार्गाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना एक प्रकारे भीती निर्माण व्हावी अशी कामे महामार्ग प्राधिकरणाने केलेली असली तरीही,याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेऊन लोकांच्या जीवाचे रक्षण करणे गरजेचे असल्याचेही बोलले जात आहे.
बघू या पुढे अजून किती अपघात या बिघडलेल्या वाहतुकीमुळे आणि रोडच्या कामामुळे होतात..