Brahmpuri.date 20/9/2022
गोसीखुर्द धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्याने वैनगंगा नदीला पूर आला व यापुरात ब्रह्मपुरी तालुक्यातील धान (भात) पिकाचे अतोनात नुकसान झाले होते.
शेतकरी हवालदिल झालेला असताना पिक विमा कंपन्यांकडून विम्याचे पैसे देण्यासंदर्भात वेगवेगळे नियम लावण्यात येत आहेत. पिकाची कापणी झाल्यानंतर नुकसान झाले तरच विम्याचे पैसे मिळतील असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. परंतु भाताचे पीक वाढण्याच्या आधीच वाहून गेले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट विमा लागू करावा अशा मागणीचे निवेदन माजी आमदार अतुल देशकर यांच्या नेतृत्वाखाली आज ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
या प्रसंगी तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.