Home सामाजिक जंगली डुकरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्तक्षेपाने...

जंगली डुकरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी; आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्तक्षेपाने पीडित कुटुंबाला 5 लाख मदतीचा मोठा आधार…

0
132

 

रामपूर (बोरी) परिसरात गुरुवारी सकाळी एक गंभीर घटना घडली. येथील शेतकरी भीमा मुत्ता पानेमवार हे शेतात काम करत असताना अचानक जंगली डुकरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात वन्यजीवांच्या वाढत्या दहशतीची चर्चा सुरू आहे.

जखमी शेतकऱ्यांच्या उपचारासाठी ग्रामस्थांनी तातडीने मदत केली. घटनेची माहिती मिळताच आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्तिगत पुढाकार घेत पीडित कुटुंबाची भेट घेतली आणि संपूर्ण वैद्यकीय व आर्थिक मदतीची हमी दिली. वन विभागाच्या माध्यमातून 5 लाख रुपयांचा धनादेश आमदारांच्या हस्ते जखमी शेतकरी भीमा पानेमवार यांच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला.

आमदार आत्राम यांनी यावेळी सांगितले की,“वन्यजीवांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या जीवितहानी व जखमी झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ तात्काळ मिळाला पाहिजे. कोणत्याही शेतकऱ्याला एकटं सोडणार नाही.”

या मदतीमुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून शेतकरी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. परिसरात वारंवार होणाऱ्या जंगली डुकरांच्या हल्ल्यांबाबत वन विभागाने खबरदारीचे उपाय वाढवावेत, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मागील काही महिन्यांपासून जंगली डुकरींचा उपद्रव वाढला असून यावर कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक आहेत. शेतकरी भीमा पानेमवार यांच्या उपचारासाठी अधिक मदत देण्याची तयारी आमदारांनी व्यक्त केली आहे.

ही घटना पुन्हा एकदा क्षेत्रातील वन्यजीवांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधणारी ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here